Tarun Bharat

जुगार खेळताना माजी आमदारासह 29 जणांना अटक

ऑनलाईन टीम / सोलापूर :

सोलापूर शहरातील रंगोली हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्या माजी आमदारासह 29 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

शहरातील विमानतळ परिसरात असलेल्या रंगोली हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने रात्री 11 च्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. यावेळी कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांसह हॉटेलबाहेर खुर्च्या टाकून बसले होते. पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी हॉटेलचे नुतनीकरण सुरू असून पाहणी करत बसल्याचे सांगितले. मात्र, एका कार्यकर्त्याच्या हातात नोटांचे बंडल दिसल्याने पोलिसांनी विचारणा केली. त्यावेळी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असता पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या सर्वांना व्हॅनमध्ये बसवून विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आरोपींकडून रोख 2 लाख 24 हजार 540 रुपये, 4 लाख 19 हजारांचे मोबाईल, 13 हजारांचे जुगार साहित्य असा एकूण 6 लाख 57 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 9,927 नवे कोरोना रुग्ण; 56 मृत्यू

Tousif Mujawar

मुंबईनंतर दिल्लीतही हजारो मजूर रस्त्यावर

prashant_c

Sangli: 416 ग्रामपंचायतसाठी मतमोजणीला प्रारंभ, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आघाडीवर

Archana Banage

आम्हाला काय होतयं? या भ्रमात राहू नका!

Archana Banage

संभाजीराजेंची संघटना आक्रमक; पुण्यात कोश्यारींना दाखवले काळे झेंडे

datta jadhav

मंदिरात चोरी ; साडेपाच किलो चांदीचा मुकुट लांबवला

Rohit Salunke