Tarun Bharat

जुना महात्मा फुले रोड रुंदीकरणाचा आटापिटा

प्रतिनिधी / बेळगाव :

जुना महात्मा फुले रोडच्या रुंदीकरणास रहिवाशांचा विरोध असतानाही महापालिका प्रशासनाने रुंदीकरणासाठी आटापिटा चालविला आहे. सदर रस्ता 40 ऐवजी 45 फूट करण्याचा घाट घालण्यात आला आहे. गुरुवारी पुन्हा मार्किंग करण्याचा प्रयत्न केला असता रहिवाशांनी आक्षेप घेऊन मार्किंग करण्याचे काम थांबविले. त्यामुळे मनपा अधिकाऱयांना माघारी परतावे लागले.

बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते डाक बंगल्यापर्यंत जुना महात्मा फुले रोड वाहतुकीस अपुरा पडत असल्याने थेट बसवेश्वर चौकपर्यंत नवीन रस्ता करण्यात आला होता. सदर रस्ता काही वर्षांपूर्वी करण्यात आला असल्याने वाहतूक या रस्त्याने सुरू आहे. मात्र, आता जुन्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. सीडीपीनुसार जुना रस्ता 40 फुटांचा आहे. पण यापूर्वी रस्त्याचे मोजमाप करून 60 फुटाप्रमाणे मार्किंग करण्यात आले. त्यामुळे त्यावेळी नागरिकांनी आक्षेप घेऊन रुंदीकरणास विरोध दर्शविला होता. मात्र, नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून गुरुवारी पुन्हा रस्त्याचे मोजमाप करून मार्किंग करण्याचा प्रयत्न मनपाच्या अभियंत्यांनी केला. मात्र, माजी महापौर महेश नाईक यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी मोजमाप करण्यास आक्षेप घेऊन हा रस्ता सीडीपीनुसार 40 फुटांचा असताना 45 फुटांचा करण्यामागचा उद्देश काय? असा प्रश्न साहाय्यक कार्यकारी अभियंते आर. एच. कुलकर्णी यांना विचारला. रस्ता 40 फुटांचा करण्यात यावा, अशी मागणी करून मार्किंगचे काम थांबविले. 

यापूर्वीच्या सीडीपीमध्ये हा रस्ता 40 फूट रुंद असल्याचे नमुद आहे. पण अचानकपणे 45 फुटांचा रस्ता करण्याचा घाट घालण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता महापालिकेच्या अभियंत्यांनी मार्किंगचे काम हाती घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सीडीपीनुसार 40 फुटांचा रस्ता करण्यास नागरिकांचा विरोध नाही. पण रुंदीकरण नको, अशी भूमिका घेतली. त्यामुळे मनपाच्या अभियंत्यांना माघारी परतावे लागले.

Related Stories

मराठी भाषेचा अभिमान बाळगा

Amit Kulkarni

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अबनाळी शाळेचे यश

Amit Kulkarni

राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात साकारतोय सफारी मार्ग

Omkar B

धनादेशाद्वारे वेतन,पीडीओंचे नैतिक पतन?

Amit Kulkarni

जाहिरात फलक शुल्क वसुलीसाठी निविदा मागविण्याच्या हालचाली

Amit Kulkarni

सर्वच क्षेत्रांमध्ये गणिताला महत्त्व

Amit Kulkarni