Tarun Bharat

जुन्या झाडांना सेलीब्रिटी दर्जा द्या: अभिनेते सयाजी शिंदे

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

अनेक पिढय़ांना ऑक्सिजन देणाऱया झाडांचे आपण ऋणी राहिले पाहिजे. भारतासह राज्यात पर्यावरणाचे नियम अतिशय उत्कृष्ट आहेत. मात्र धोरणकर्त्यांनी पर्यावरणाची हानी न करणारी धोरणे आखली पाहिजेत. पर्यावरण संवर्धनासाठी देशी झाडांची लागवड केली पाहिजे. त्याचबरोबर सिने अभिनेते, राजकारणी यांच्यापेक्षा जुन्या झाडांचा शोध घेवून त्यांना टॉप टेन सेलीबिटींचा दर्जा दिला पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेते तथा तथा सह्याद्री वनराई वृक्ष चळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी केले.

फ्रायडेज फॉर फ्युचरच्या वतीने जागतिक युवा दिनानिमित्त आयोजित ’ग्रेटाची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मराठी मालिकेतील पहिल्या व्हिडीओचा लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पर्यावरण प्रेमी सुहास वायंगणकर,फ्रायडेज फॉर फ्युचरचे नितीन डोईफोडे उपस्थित होते.

अभिनेते शिंदे म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात पर्यावरणासंदर्भात नुसते धडे देवून चालणार नाही. तर प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोल्हापूर जिल्हय़ातील मजगे, जांभळे, शहरातील विविध संस्था वृक्षारोपनाचे काम करतात हे ऐकूण खूप बरे वाटल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकासाच्या नावाखाली झाडे न तोडता दऱयाखोऱयात झाडे लावली तरच पुढच्या पिढीला पुरेसा ऑक्सिजन मिळेल. जुनी झाडे पाहण्यासाठी सहली काढल्या तर मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती होईल. तसेच जंगले, त्यांना जोडणारे कॉरिडॉर हे सांभाळले तरच वाघांचे व पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. वाघासह प्राणी, पक्षी मारणाऱया, झाडे तोडणाऱया प्रत्येकाला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले. दोनशे-तीनशे वर्षे आपल्याला ऑक्सिजन देणारी झाडेच सेलीब्रिटी आहेत. भविष्यात शाळेत वृक्ष बँक तयार केली पाहिजे. आईप्रमाणे ऑक्सिजनला महत्व असून, जो जास्त ऑक्सिजन घेतो, तो जास्त श्रीमंत आहे.

ग्रेटा थनबर्ग पुस्तकाविषयी शिंदे म्हणाले, ग्रेटा थनबर्ग नावाच्या नववीत शिकणाऱया स्वीडन देशातील मुलीने शाळा बंद आंदोलन पुकारले. वेली, पशू, पक्षी, नद्या, डोंगर व माणसाच्या निष्पाप भावी पिढीचा ती आवाज बनली. जगातील सर्व पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष व उद्योगपतींच्या समोर ती निर्भीडपणे बोलत राहिली, अन मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन उभे राहिले. 200 देशातील 1 कोटीहून अधिक लोक या चळवळीत सामील झालेत. ग्रेटा थनबर्गची भाषणे भावी पिढीला दिशादर्शक आहेत.

सिद्धार्थ शिंदे म्हणाले, जागतिकीकरणाचे संकट चिंताजनक असून पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यावेळी फ्रायडेज फॉर फ्युचर चे योगेश माळी, सविता साळोखे, उमाकांत चव्हाण, महेश शेटे, अरुणा डोईफोडे, धीरज चौगुले, अथर्व, समृद्धी, सृष्टी, वेद व वृक्षाप्रेमीचे अमोल बुद्धे, परितोष उरकुडे, अक्षय कांबळे, त्यात्या गोवावाला, अमर पाटील, आप्पासाहेब पाटील उपस्थित होते.

Related Stories

वैराग ग्रामपंचायत कार्यालयात रंगली दारू पार्टी

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज मिळणार

Rohan_P

सातारा : वडुथ येथे युवकाचा पाय तोडून खून

Abhijeet Shinde

भोगावती नदीत बुडून शाळकरी मुलीचा मृत्यू

Abhijeet Shinde

शहरातील सराफ व्यापायांची दुकाने नियम अटीवर होणार सुरू

Patil_p

विनयभंग प्रकरणी संजय धुमाळ यांना अटक

Patil_p
error: Content is protected !!