Tarun Bharat

जुन्या बसपासच्या मुदतीत 31 मार्चपर्यंत वाढ

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 2019-20 या शैक्षणिक वर्षात वितरीत करण्यात आलेले बसपास यंदाच्या शैक्षणिक वर्षातील फेब्रुवारीपर्यंत वैध ठरविण्यात आले होते. ही मुदत संपल्यामुळे जुन्या बसपासची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी हा आदेश दिला आहे.

कोरोना परिस्थितीमुळे 2021-22 हे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले. परंतु, पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांना नवे बसपास वितरीत करण्यासाठी सेवासिंधू पोर्टलवर अर्ज करण्याची पद्धत आमलात आणण्यात आली आहे. ही प्रकिया संथगतीने सुरू आहे. शिवाय पालक संघटनांनी जुन्या बसपासची मुदत वाढविण्याची मागणी केल्यामुळे आतापर्यंत चार टप्प्यात जुन्या बसपासची मुदत वाढविण्यात आली आहे.

2019-20 या शैक्षणिक वर्षात वितरीत केलेल्या बसपासबरोबरच यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा-महाविद्यालयांमध्ये भरलेल्या शुल्काची पावती दाखवून विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास करता येत आहे.

Related Stories

बीएससी प्रवेशासाठी सीईटी गुणांचा विचार होणार नाही

Archana Banage

नववीपासूनच्या शाळा 23 पासून भरणार

Amit Kulkarni

बेंगळूर: बीएमटीसी एसएसएलसी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देणार विनामूल्य बस सेवा

Archana Banage

धारवाडमध्ये २१ जूनपासून लग्न समारंभास परवानगी

Archana Banage

रुग्णवाहिकांच्या मनमानी वसुलीला चाप

Amit Kulkarni

आजपासून विविध जिल्हय़ांना वाटप

Patil_p
error: Content is protected !!