Tarun Bharat

जुन्या म.फुले रोडचे अखेर डांबरीकरण

प्रतिनिधी / बेळगाव

जुना महात्मा फुले रोडच्या डांबरीकरणाचे काम मागील तीन वर्षापासून रखडले होते. मात्र सदर रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला असून जुना म. फुले रोडच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे. रस्ता व्यवस्थित झाल्याने रहिवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गेवावेस ते एसपीएम रोडपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर महात्मा फुले रोडच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले होते. सदर रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने पॅचवर्क करण्यात आले होते. या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी झाल्याने रस्त्याचा विकास करण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला होता. अशातच डेनेज वाहिन्या घालण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आल्याने संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारकांना, रहिवाशांना आणि व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याच्या मध्यभागी डेनेज चेंबर घालण्यात आल्याने ये-जा करणाऱया चार चाकी वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहनांचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. पण महापालिका प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुष्कील बनले होते. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी येथील रहिवासी आणि व्यावसायिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले होते. मात्र, रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त लाभला नव्हता. मागील वषीपासून रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले हेते. पण रस्त्याच्या रुंदीवरून काम रखडले होते. अलीकडेच रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला असून मागील काही दिवसांपासून सदर काम हाती घेऊन डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता गुळगुळीत झाला असून वाहनधारक, रहिवासी आणि व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. काही भाग वगळता सर्व रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.

Related Stories

दूधसागरनजीक दरड कोसळली

Amit Kulkarni

ड्रेनेजवाहिन्यांच्या चरीमुळे शिवबसवनगर रस्त्यावर चिखल

Amit Kulkarni

तुरमुरीत भरदिवसा घरफोडी; चार लाखांचा ऐवज लंपास

Omkar B

भातकांडे स्कूलच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण

Patil_p

युवा समिती आणि जिल्हा प्रशासनाची बैठक

Patil_p

बळ्ळारी नाल्यात ड्रेनेजचे पाणी, पावसाळय़ात होणार गंभीर परिस्थिती

Tousif Mujawar