वेबसीरिजमध्ये दिसणार अपारशक्ति खुराना
बॉलिवूडचा अभिनेता अपारशक्ति खुराना स्वतःची आगामी वेबसीरिज ‘जुबली’वरून चचेंत आहे. या वेबसीरिजची कहाणी प्रेमासाठीच्या वेडावर आधारित आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओने या सीरिजच्या ग्लोबल प्रीमियरची घोषणा केली आहे. या वेबसीरिजमध्ये एकूण 10 एपिसोड्स असून याचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानीने केले आहे. ‘जुबली’ वेबसीरिजमध्ये अपारशक्ति खुराना याच्यासह अदिति राव हैदरी, वामिका गब्बी, प्रसेनजीत चटर्जी, सिद्धांत गुप्ता, नंदीश संधू आणि राम कपूर यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.


प्रेमाचा पराकाष्ठा दर्शविणारी ही वेबसीरिज असून यातील व्यक्तिरेखा स्वतःची स्वप्ने, महत्त्वाकांक्षा आणि प्रेम मिळविण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असल्याचे दाखविण्यात आले आहे. 7 एप्रिलपासून या वेबसीरिजचे 5 एपिसोड्स पाहता येणार आहेत. तर त्यापुढील एपिसोड्स 14 एप्रिल रोजी स्ट्रीम होतील.
जुबली ही पेमकहाणी असून ती माझ्या मनात स्थान मिळवून राहिली आहे. याची कहाणी प्रत्येक व्यक्तीविषयी काहीतरी सांगणारी आहे. प्रेक्षकांना या सीरिजशी जोडण्यासाठी याच्या प्रत्येक पैलूवर आम्ही मोठी मेहनत केली आहे. या सीरिजच्या प्रवासात सर्वात अद्भूत कलाकार आणि आतापर्यंतच्या सर्वश्रेष्ट टीमने मिळून काम केले असल्याचे मोटवानीने म्हटले आहे.