वृत्तसंस्था/ लंडन
2019-20 च्या प्रिमियर लीग फुटबॉल हंगामात लिव्हरपूल क्लबचे बॉस जुर्गेन क्लॉप यांची सर्वोत्तम व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली. लिव्हरपूल क्लबने तब्बल 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच यावेळी प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
जुर्गेन क्लॉपच्या लिव्हरपूल संघाने चालूवर्षीच्या प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत 38 पैकी 32 सामने जिंकत गुणतक्त्यात 99 गुणांसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा तहकूब करण्यात आली होती त्यावेळी बरेच सामने बाकी होते. लिव्हरपूलचे सात सामने खेळविले गेले नाहीत. प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्तम व्यवस्थापक शर्यतीमध्ये 53 वर्षीय क्लॉप, चेल्सीचे बॉस लँपार्ड आणि लिसेस्टर सिटीचे व्यवस्थापक रॉजर्स यांच्यात चुरस निर्माण झाली होती.