Tarun Bharat

जुलैमध्ये वाहन विक्री घसरली

Advertisements

ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनची आकडेवारी सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना महामारीमुळे वाहन क्षेत्र पूर्णपणे प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. जुलै महिन्यात देशातील वाहन विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 36 टक्क्मयांनी घसरली आहे. अशी माहिती देशील ऑटोमोबाईल रिटेल उद्योगाची सर्वोच्च संस्था फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) यांच्या आकडेवारीमधून देण्यात आली आहे.

एकूण वाहन विक्रीमध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहनांची विक्री 37.47 टक्के, तीनचाकी 74.33 टक्के, व्यावसायिक वाहन विक्री 72.18 टक्के आणि वैयक्तिक वाहनाची विकी 25.19 टक्क्मयांनी घसरल्याची माहिती आहे. परंतु चालू वर्षातील जूनपेक्षा जुलैचे आकडे समाधानकारक आल्याचे स्पष्ट केले आहे. 

उपलब्ध चलनाचा अभाव, बँका आणि एनबीएफसी जोखित पत्करण्यास तयार नसल्याने व्यावसायिक, तीनचाकी आणि दुचाकी वाहनांची मागणी मोठय़ा प्रमाणात प्रभावीत होत गेली आहे. आणि त्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम मागणीवर झाल्याचे फाडाने सांगितले आहे.

कर्ज देण्यास बँकां व एनबीएफसीचा नकार

चांगला मान्सून होत असल्याने ग्रामीण बाजारात तेजीसोबत रिकव्हरी पहावयास मिळत आहे. या कालावधीत ट्रक्टर, लहान व्यावसायिक वाहने आणि मोटारसायकलीच्या विक्रीत सकारात्मकतेचा कल आहे. तर दुसऱया बाजूला बँका आणि एनबीएफसी यांच्याकडे पुरेसे चलन उपलब्ध असूनही त्या कर्ज देण्यात हात आकडता घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Related Stories

होंडाच्या शाईनची विक्री 1 कोटीवर

Patil_p

‘अपाचे’ची जागतिक विक्री 40 लाखापार

Patil_p

भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च

Patil_p

ऑटो डीलर्सची 300 शोरुम्स बंद

Patil_p

दमदार फिचर्ससोबत हिरोची ‘एक्स्ट्रीम 200 एस’ दाखल

Omkar B

दुचाकी विक्रीत ओला इलेक्ट्रिक चौथ्या स्थानी

Patil_p
error: Content is protected !!