Tarun Bharat

जुलै महिन्यात 9 वेळा वाढली पेट्रोलची किंमत; जाणून घ्या आजचा दर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


जागतिक बाजारातील इंधन दरवाढीचा भार सोसणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांना किंचित दिलासा दिला. आज कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थेच ठेवले आहेत. याआधी शनिवारी पेट्रोल 26 ते 34 पैशांची वाढ झाली होती. डिझेलचे दर स्थिर होते.

  • मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये


आज मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव 107.83 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव 102.49 रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लिटर पेट्रोल 102.08 रुपये झाले आहे. तर जयपूरमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 108.71 रुपये मोजावे लागत आहेत. 


मुंबईत डिझेलचा भाव 97.45 रुपये आहे. दिल्लीत डिझेल 89.87 रुपये झाले आहे. चेन्नईत 94.39 रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव 93.02 रुपये प्रति लीटर झाला आहे. तर जयपूरमध्ये 99.02 रुपये प्रति लिटर इतका दर आहे. 

  • ‘या’ शहरात शंभरी पार 


देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत. 

  • जुलैमध्ये 9 वेळा वाढले पेट्रोलचे दर 


पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 4 मे पासून आतापर्यंत 40 वेळा पेट्रोलचे तर 38 वेळा डिझेलचे दर वाढले आहेत. तर जुलै महिन्यात आता पर्यंत 9 वेळा तर 5 वेळा डिझेलचे दर वाढले आहे. 

Related Stories

आरबीआय अँक्शन मोडमध्ये; बँकांकडून मागीतला अदानी समुहाला दिलेल्या कर्जाचा तपशील

Abhijeet Khandekar

विदेशी चलन साठ्यात मोठी वाढ

Patil_p

पेगॅससवरुन दोन्ही सभागृहात गदारोळ

Amit Kulkarni

कोविड निदानासाठी क्रॅश कोर्स

Archana Banage

आर्यन खानची पुन्हा कोर्टात धाव; विशेष कोर्टात याचिका दाखल

Abhijeet Khandekar

पॅराशूट न उघडल्याने पॅरा कमांडोचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!