Tarun Bharat

जुवारी ऍग्रो जमिनीचा महाघोटाळा

Advertisements

विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांचा आरोप

प्रतिनिधी /म्हापसा

गोमंतकीयांना नोकऱया मिळतील म्हणून जुवारी ऍग्रो केमिकल्सला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात 50 लाख चौ. मी. जागा 1 रु. प्रति चौ.मी. दराने दिली होती. ही जागा कोमुनिदादची असून ती विकत नव्हे, तर भाड्डेपट्टीवर देण्यात आली होती. ती अन्य कुणाला विकता, स्थलांतरित करता येणार नाही. भाजप सरकारच्या काळात ही जमीन परस्पर विकण्यात आल्याने हा महाघोटाळाच आहे. येत्या विधानसभेत हा प्रश्न आपण उपस्थित करणार आहे, असे  विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी सांगितले. पर्रा पंचायतीजवळ ग्रामस्थांसाठी झाडे वाटप कार्यक्रम झाला, त्यावेळी लोबो पत्रकारांशी बोलत होते.

आरक्षणावर तोडगा काढा

राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. त्यात महिला, एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणात मोठा घोळ घातला आहे. सरकारने पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगोदरच सर्व डेटा मिळवायला हवा होता. आता सर्व बीएलओना डेटा गोळा करायला सांगितला आहे. आठ दिवसात ते शक्य आहे का? झाले तर चांगलेच आहे. आरक्षणाला आपण यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे, असेही ते म्हणाले.

चांगल्या लोकांना निवडून द्या

ही निवडणूक ग्रामपातळीवर आहे, तुमची कामे करणाऱया चांगल्या माणसालाच निवडून द्या. जेणेकरुन तुमच्या प्रभागाचा, गावाचा विकास होईल. तुम्ही ठरविलेल्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल. निवडणुकीच्या बाबतीत काँग्रेसची बैठक अद्याप व्हायची आहे, त्यात चर्चा करुन पुढची रणनिती ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इतरांनी भोगले, आम्हीही त्रास भोगत आहोत

नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे आपल्याला टार्गेट करीत आहेत ही गोष्ट खरी आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत कोणालाही आपण वैयक्तिक टार्गेट वा सूडही उगवलेला नाही. राणेंशी आपले वैयक्तिक काही वाईट नाही. आपण भाजपमधून काँग्रेसमध्ये आलो यामुळेच त्रास सुरु झाला आहे. राजकीयदृष्टय़ा अनेकांनी हा त्रास भोगला असून आता आपल्या वाटय़ाला आल्याचे मायकल लोबो म्हणाले.

आपण काँग्रेसमध्येच राहाणार

मायकल लोबो स्वगृही म्हणजे भाजपात परतणार असे सर्वत्र बोलले जात आहे ही सर्व अफवाच आहे. तसे काही नाही. आपणाला काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिले असून ती जबाबदारी आपण योग्यप्रकारे पार पाडणार असल्याची माहिती मायकल लोबो यांनी दिली.

Related Stories

सुकलेल्या झाडाचे खोड कासळून इसम जखमी

Amit Kulkarni

प्रतिष्ठित माणसामुळे सुसंस्कृत समाज घडतो

Patil_p

उन-पावसातही फोंडय़ात माटोळी बाजार गजबजला

Patil_p

वास्कोतील रविंद्र भवन दोन वर्षांपासून आजारी

Amit Kulkarni

टॅक्सीचालकांना मिळाली दरवाढ

Amit Kulkarni

भंडारी समाज कार्यालयास प्रथमच एका मुख्यमंत्र्याची भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!