Tarun Bharat

जूनमध्ये इंधनाची 16.29 दशलक्ष टन विक्री

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशामध्ये जवळपास मार्च महिन्याच्या अंतिम आठवडय़ापासून लॉकडाऊन केल्यानंतर 1 जूनपासून अनलॉकचा प्रारंभ केला आहे. याच दरम्यान व्यवसाय सुरु ठेवण्यास काही प्रमाणात शिथिलता मिळत गेल्याने आर्थिक व्यवहारांमध्ये तेजी येत असल्याचे पहावयास मिळत आहे. याचाच भाग म्हणून जूनमध्ये खनिज तेलाची विक्री तेजीने वधारली असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे प्रतिबंध लागू असल्याने एप्रिलमध्ये तेलाची विक्री 13 वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेली होती.

वरील आकडेवारीपेक्षा जून महिन्यात 16.29 दशलक्ष टन तेलाची विक्री झाली आहे तर मे महिन्याच्या तुलनेत हा आकडा 11 टक्क्मयांनी अधिक असल्याची माहिती पेट्रोलियम ऍण्ड नॅचरल गॅस मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग ऍण्ड ऍनालिसिस सेलच्या (पीपीएसी) माध्यमातून देण्यात आली आहे. एक वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ही विक्री 7.9 टक्क्मयांनी कमी आहे. रिफाइंड ऑईल विक्रीची मागणी माफक होण्याचे म्हटले आहे. एप्रिलमध्ये 9.94 दशलक्ष तेलाची विक्री राहिली होती. एप्रिलच्या तुलनेत जूनमध्ये 64 टक्के विक्री जादा झाली आहे.

डिझेलची विक्री दुप्पट

उपलब्ध माहितीच्या आधारे जून महिन्यात तेलाची विक्री 6.30 दशलक्ष टन राहिली आहे. एप्रिलमध्ये 3.26 दशलक्ष टन तेलाच्या विक्रीच्या तुलनेत दुप्पट आहे. देशातील एकूण तेलाच्या विक्रीत डिझेलचा हिस्सा जवळपास 40 टक्के आहे. जूनमध्ये पेट्रेल किंवा गॅसोलीनची विक्री एप्रिलच्या तुलनेत 134 टक्क्मयांनी वधारुन 2.28 दशलक्ष टनावर पोहोचली आहे.

इंडस्ट्रीयल ऑईल विक्री तेजीत

जूनमध्ये इंडस्ट्रीयल ऑईलच्या विक्रीत वाढ झाली आहे. डाटाच्या तुलनेत जूनमध्ये नेफ्था तेलाची विक्री एक वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 18.2 टक्क्मयांनी वधारुन 1.17 दशलक्ष टनावर राहिली आहे.

Related Stories

सिस्को करणार 1200 जणांची भरती

Patil_p

‘कोरोना’ग्रस्त अर्थव्यवस्थेला ‘आरबीआय’चा डोस !

tarunbharat

मेड इन इंडिया व्हिडीयो ऍप सादर

Patil_p

तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्थव्यस्थेला बळकटी देणार

Patil_p

जीपीएफच्या व्याजदरात कपात

Patil_p

भारतीय चहा आयात केला जात नाही ?

Patil_p