Tarun Bharat

जूनमध्ये येईल लसीकरणाला वेग

Advertisements

महिन्याभरात 12 कोटी लसींचा पुरवठा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जून महिन्यात किमान 12 कोटी कोरोना डोस उपलब्ध होतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. एकूण 12 कोटी डोसपैकी 6 कोटी 9 लाख डोस केंद्र सरकार विनामूल्य वाटप करणार आहे. तर 5 कोटी 86 लाख पेक्षा जास्त डोस राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मे महिन्यात सुमारे 8 कोटी कोरोना डोस उपलब्ध करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. एकंदर जून महिन्यात डोसच्या मुबलक पुरवठय़ामुळे लसीकरणाचा वेग वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

लस पुरवठादार कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आता या लसींच्या वाटपाचे वेळापत्रक राज्यांना पाठविले असून पुढील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित अधिकाऱयांना वाटप केलेल्या डोसचा तर्कसंगत आणि न्याय वापर सुनिश्चित करावा आणि लसीचा अपव्यय कमी करावा, असेही केंद्र सरकारने राज्यांना बजावले आहे.

जून महिन्यासाठी आरोग्य सेवा कामगार (एचसीडब्ल्यू), आघाडीवरचे कामगार आणि 45 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी प्राधान्य गट कोविड प्रतिबंधक लसींसाठी 6 कोटी 09 लाख 60 हजार डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या जातील. याव्यतिरिक्त, राज्य/ केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांना थेट खरेदीसाठी 5 कोटी 86 लाख 10 हजारपेक्षा जास्त डोस उपलब्ध असणार आहेत.

मे महिन्यात केंद्र सरकारने राज्यांना 4 कोटी 03 लाख 49 हजार 830 लसींचे डोस विनामूल्य दिले होते. याशिवाय मे महिन्यात राज्यांसह खासगी रुग्णालयांच्या थेट खरेदीसाठी एकूण 3 कोटी 90 लाख 55 हजार 370 डोस देखील उपलब्ध होते. एकंदर मे महिन्यात कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी एकूण 7 कोटी 94 लाख 05 हजार 200 डोस उपलब्ध झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

जूनमध्ये 10 कोटींपर्यंत लसपुरवठय़ाचे ध्येय- सीरम

‘कोव्हिशिल्ड’ची निर्मिती करणाऱया सीरम इन्स्टिटय़ूट कंपनीने केंद्र सरकारला 9 कोटींपर्यंत लसपुरवठा करणार असल्याचे कळविण्यात आले आहे. मात्र, येत्या महिन्याभरात 10 कोटींहून अधिक कोरोना डोस निर्मितीचे ध्येय कंपनीने निश्चित केले आहे. कंपनीकडे सध्या पुरेसा कच्चा माल, मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध असल्याने कंपनीने अधिकाधिक उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा पार

आता हळूहळू कंपन्यांकडून पुरवठा वाढत असल्यामुळे लाभार्थींना लस देण्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. देशात लसीकरणाचा वेग जूनपासून वाढण्याची अपेक्षा आहे. भारताने लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ तीन टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 12 टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे.

Related Stories

‘या’ लसीबाबत संभ्रम कायम; अनेक देशात निर्बंध

datta jadhav

सौर ऊर्जेचा वापर केल्यास भारत जगात अव्वल !

Abhijeet Khandekar

काळाखोत प्रकाशमान होणाऱया मशरुमचा शोध

Patil_p

शेतकऱयांसाठी खतांचा पुरेसा पुरवठा करणार !

Patil_p

कोरोनावरील ‘मोलनुपिरावीर’ गोळी होणार लाँच

datta jadhav

पंजाबमध्ये आजपासून अर्ज नामांकन प्रक्रिया

Patil_p
error: Content is protected !!