Tarun Bharat

जून-जुलैमध्ये आढळतील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण : एम्स संचालक

Advertisements

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार कडून देखील विविध प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच आता दिल्लीतील एम्स चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी चिंता वाढवणारे भाकीत केले आहे. 


ते म्हणाले, संपूर्ण देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता देशात जून-जुलैमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळतील. 


पुढे ते म्हणाले, आत्ताच्या आकड्यांनुसार, यामध्ये अनेक बदल देखील होऊ शकतात. जसा वेळ पुढे पुढे जाईल तेव्हाच आपल्याला कळेल की याचा प्रभाव अजून किती दिवस असणार आहे.  


तसेच आपल्याला लॉक डाऊनचा फायदा होतो आहे. मात्र, हा आजार झटकन संपून जाईल असे होणार नाही. आपल्याला कोरोना सोबत रहावे लागेल. हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, असं ही त्यांनी यावेळी सांगितले. 


दरम्यान, सध्या भारतात कोरोना बाधितांची संख्या 50 हजारच्या आसपास आहे. तर आत्तापर्यंत 1 हजार 783 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

‘उद्या तुमचीपण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा’; संदीप देशपांडेंचं ट्विट

Abhijeet Shinde

निर्भया : क्युरेटिव्ह याचिका फेटाळली, दोषींना 22 जानेवारीला फाशी

prashant_c

भ्रष्टाचारात सामील अधिकाऱयांच्या संख्येत वाढ

Patil_p

पंजाबमधील लक्षवेधी मतदारसंघ ‘लंबी’

Patil_p

कोल्हापुरात NIA ने टाकला छापा, दोघे ताब्यात

Archana Banage

जिल्हा बँकेची अध्यक्ष निवड 20 जानेवारीला; ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होणार अध्यक्ष

Abhijeet Shinde
error: Content is protected !!