Tarun Bharat

जून महिन्यात पाच कोटी घरपट्टी मनपाकडे जमा

पाच टक्के सवलतीची मुदत जुलैअखेरपर्यंत

प्रतिनिधी /बेळगाव

घरपट्टीवरील पाच टक्के सवलतीवरील मुदत वाढविण्यात आल्याने आतापर्यंत 18 कोटीचा महसूल मिळाला आहे. जून महिन्यात लॉकडाऊन खुले झाल्यानंतर नागरिकांनी पाच टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी घरपट्टी भरल्याने जून महिन्यातच पाच कोटी रुपये घरपट्टी जमा झाली आहे.

महापालिकेच्यावतीने चालू वर्षाचा कर एप्रिल महिन्यात भरून घेतला जातो. तर जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता कर भरावा याकरिता पाच टक्के सवलत देण्यात येते. यामुळे किमान 25 ते 30 टक्के मालमत्ताधारक एप्रिल महिन्यातच मालमत्ता कर भरतात. यंदा 2021-22 आर्थिक वर्षात महसूल विभागाला कर वसुलीचे उद्दिष्ट गाठता आले नाही. लोकसभा पोटनिवडणुकीमुळे एप्रिल महिन्यात  12 कोटी घरपट्टी जमा झाली आहे. पण कोरोनामुळे दि. 15 एप्रिलपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवसाय आणि कार्यालये बंद होती. त्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली होती. परिणामी घरपट्टी जमा झाली नाही. कोरोनामुळे चालू आर्थिक वर्षाचा कर एप्रिल महिन्यात भरून 5 टक्के सवलतीचा फायदा असंख्य मालमत्ताधारकांना घेता आला नाही. त्यामुळे पाच टक्के सवलतीची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच लॉकडाऊनमुळे बेळगाव वन कार्यालय बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना घरपट्टी भरता आली नाही. दि. 21 जूनपासून अनलॉक प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आल्याने घरपट्टी भरण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे केवळ जून महिन्यात पाच कोटीची घरपट्टी जमा झाली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे राज्य शासनाने पाच टक्के सवलतीच्या मुदतीत जुलैअखेरपर्यंत वाढ केली आहे.  

यंदा 50 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिकेचे आहे. एप्रिल महिन्यात 12 कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला होता. मात्र मे महिन्यात कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने केवळ 90 हजाराची घरपट्टी जमा झाली आहे. मात्र जून महिन्याच्या अखेरीस तसेच ऑनलाईन घरपट्टी जमा केल्याने पाच कोटी जमा झाले आहेत. पाच टक्के सवलतीसाठी मुदत वाढविल्याने कोरोनाच्या महामारीतदेखील शहरवासियांनी घरपट्टी जमा केली आहे. त्यामुळे आतापर्यंत 18 कोटी घरपट्टी जमा झाली आहे.

Related Stories

पश्चिम भागात पावसामुळे दोन ठिकाणी झाडे कोसळली

Amit Kulkarni

पन्हाळगडावर मस्ती करायला येताय..? मग तुमच्यासोबत आता ‘हे’ होऊ शकते..

Rahul Gadkar

मच्छे येथील 220 केव्ही स्टेशनसाठी लवकरच निविदा

Amit Kulkarni

दुसऱया आठवडय़ातही विकेंड कर्फ्यू

Patil_p

साईडपट्टय़ा खराब झाल्यानेच कौंदल वळणाजवळ अपघात

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात कोरोनामुळे चौघे जण दगावले

Amit Kulkarni