Tarun Bharat

जॅकीदादाने कुणासमोर जोडले हात?

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणाऱया इंडियाज गॉट टँलेट या कार्यक्रमातील एका सादरीकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे. सध्या या ‘रिऍलिटी शो’चा 9 वा सीझन सुरु आहे. त्यामध्ये जॅकीदादा सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी जेव्हा त्या शोमध्ये सादरीकरण केलेल्या इशिताचे गाणे ऐकले तेव्हा ते कमालीचे भारावून गेले. त्यांना अश्रु अनावर झाले. अशावेळी त्यांनी ईशिताचं तोंड भरुन कौतुक केलं. सध्या या व्हिडिओला नेटकऱयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यावर त्यांनी कमेंटही केल्या आहेत.

इंडियाज गॉट टँलेटमधील इशितानं आपल्या गायकीनं सर्वांना खूश केलं आहे. तिचं गाणं ऐकून जॅकीदादा भावूक झाल्याचे दिसून आले आहे. इशितानं आपल्या आवाजनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांना प्रतिक्रिया आणि दाद देण्यास भाग पाडले आहे. तिचा आवाज जेव्हा जॅकी श्रॉफ यांनी ऐकला तेव्हा त्यांना अश्रु आवरणं कठीण झालं होतं. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱयांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी त्याला वेगवेगळय़ा प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. नेटकऱयांनी इशिताचं कौतुक केलं आहे. जॅकी दादांनी इशिताला हात जोडले आणि तिला आशीर्वादही दिले.

Related Stories

सतत काम करत राहण्याची गरज

Patil_p

प्रथम रामलल्लाचे दर्शन, मग रामसेतूचे शूटिंग

Patil_p

अभिनेता अक्षय कुमार रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागू : ईशा केसकर

Patil_p

‘अरुवी’च्या हिंदी रिमेकमधून फातिमा बाहेर

Patil_p

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

Tousif Mujawar