Tarun Bharat

जेईई आणि नीट परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंजिनिअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नीटची 26 जुलैला होणारी परीक्षा आता 13 सप्टेंबर होणार आहे. तर जेईई मुख्य परीक्षा 18 ते 23 जुलैला होणार होती ती आता 1 ते 6 सप्टेंबर आणि ॲडव्हान्स 27 सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटद्वारे दिली. 


ते म्हणाले, विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षांसाठी केंद्र बदलण्याची मुभा देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. 4 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान विद्यार्थी यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.


जेईई परीक्षांमार्फत देशभरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर राष्ट्रीय पात्रतेसह घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमार्फत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो.

देशभरातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केला आहे. या परीक्षेमार्फत देशभरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई-मेन्स परीक्षेसाठी अर्ज केला आहे.


जेईई मेन्स परीक्षेमार्फत आयआयटी वगळता इतर इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. जेईई मेन्स परीक्षा जेईई ॲडवान्स परीक्षेसाठी महत्त्वाची मानली जाते. जेईई ॲडवान्स परीक्षेमार्फत आयआयटीमध्ये प्रेवश देण्यात येतो. 

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये 232 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

आंध्रमध्ये देवांच्या मूर्तीची विटंबना सुरूच

Patil_p

आसाममध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंप

Patil_p

आयएनएस विक्रमादित्यवर तेजस विमानाचे अरेस्टेड लँडिंग

Patil_p

मोबाईल ऍप क्षेत्र.. प्रतिभावंतांची सुवर्णभूमी

Patil_p

बीरभूम जळीतकांडाच्या प्रमुख आरोपीला अटक

Amit Kulkarni