Tarun Bharat

जेईई, नीट परीक्षांच्या तारखांबाबत उद्या घोषणा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी जेईई आणि नीट परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा उद्या म्हणजेच 5 मे रोजी केली जाणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता नव्या तारखा उद्या घोषित केल्या जातील असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखारियाल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, यावर्षी देशातील 15 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ‘नीट’साठी नोंदणी केली आहे. तर ‘जेईई’ परीक्षेसाठी नऊ लाखाहून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. 

Related Stories

यंदा मान्सूनमध्ये सरासरीच्या 101 टक्के पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज

Tousif Mujawar

Khashaba Jadhavऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांना गुगलकडून अभिवादन

Abhijeet Khandekar

अफगाणिस्तानच्या निर्वासित महिला नेत्या संयुक्त राष्ट्राला प्रथमच देणार भेट

Archana Banage

कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के

datta jadhav

सराव शिबिरासाठी 24 जणांचा संघ जाहीर

Patil_p

उत्तरप्रदेशात 40 टक्के महिलांना उमेदवारी; प्रियंका गांधींची घोषणा

datta jadhav