Tarun Bharat

जेडीएसचा ‘हा’ नेता ३० जुलै रोजी करणार काँग्रेस प्रवेश

बेंगळूर/प्रतिनिधी

माजी आमदार आणि जद (एस) नेते मधु बंगारप्पाहे ३० जुलै रोजी सकाळी 9 वाजता हुबळी येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय अधिवेशनात अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.

बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि कर्नाटकातील पक्षाचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अन्य नेते प्रवेशावेळी उपस्थित असतील.

मधु हे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस बंगारप्पा यांचे पुत्र आहेत आणि ते एकदा सोरबमधून आमदार राहिले आहेत. दरम्यान, आमदार असताना त्यांनी सोरबच्या विकासासाठी काम केले. मधु यांचे कॉंग्रेसमध्ये येणे पक्षासाठी फायदेशीर ठरेल. ते म्हणाले की हुबळी येथे होणाऱ्या अधिवेशनात जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष एच. एस. सुंदरेश आणि जिल्ह्यातील अनेक नेते भाग घेतील.

Related Stories

म्हैसूर विमानतळावर नवीन सुविधांचा शुभारंभ

Archana Banage

राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय मूर्खपणाचा : सिद्धरामय्या

Archana Banage

राज्यात कोरोना रुग्णवाढीचे चक्र सुरूच

Archana Banage

यूजीसीईटी : विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी कागदपत्रे स्वत: सादर करावी

Archana Banage

खासगी रुग्णालयांना कोरोना उपचार शुल्क दर्शवण्याचे आदेश

Archana Banage

मी मंत्रीपदासाठी इच्छुक नव्हतो: विजयेंद्र

Archana Banage