Tarun Bharat

जेमिमा रॉड्रिग्यूज द हंड्रेड स्पर्धेत खेळणार

वृत्तसंस्था/ मुंबई

भारताची महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्यूज ब्रिटनमध्ये 21 जुलैपासून खेळविल्या जाणाऱया महिला गटातील ‘द हंड्रेड’ क्रिकेट स्पर्धेत नॉर्दन सुपरचार्जर्स संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रित कौर उपकर्णधार स्मृती मंदाना तसेच सलामीची फलंदाज शेफाली वर्मा आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा देखील सहभागी होणार आहेत.

21 जुलैपासून सुरू होणारी द हंड्रेड क्रिकेट स्पर्धा पुरूष आणि महिलांसाठी राहील. सदर स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांचा समावेश राहील. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे रॉड्रिग्यूजने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

नॉर्दन सुपरचार्जर्स संघाचे नेतृत्व लॉरेन विनफिल्ड करीत आहे. 16 जूनपासून यजमान इंग्लंड आणि भारत महिला क्रिकेट संघामध्ये एकमेव कसोटी सामना खेळविला जाणार असून त्यानंतर उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने होणार आहेत. इंग्लंड दौऱयासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय महिला संघामध्ये रॉड्रिग्यूजचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये सध्या इंग्लंडच्या दौऱयावर जाणाऱया पुरूष आणि महिला संघातील क्रिकेटपटू 14 दिवसांच्या क्वॉरटाईनमध्ये आहेत. नॉर्दन सुपरचार्जर्स संघामध्ये ऑस्ट्रेलियाची अव्वल क्रिकेटपटू ऍलिसा हिलीचा समावेश आहे. विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱया इंग्लंडच्या महिला संघामध्ये लॉरेन विनफिल्डचा समावेश होता. 2019 साली झालेल्या किया सुपरलीग महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताच्या रॉड्रिग्ज, कौर, मंदाना आणि शर्मा यांनी भाग घेतला होता. ईसीबीच्या राष्ट्रीय टी-20 क्रिकेट स्पर्धेचे रूपांतर आता द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेत करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना लंडनमध्ये 21 जुलैला ओव्हल इनव्हीनसिबेल्स आणि मँचेस्टर ओरिजीनल्स यांच्यात होणार आहे.

Related Stories

सूर्यकुमारची एकाकी झुंज निष्फळ

Patil_p

सामनाधिकारी कोरोना बाधित

Patil_p

रोहित शर्माला 12 लाखाचा दंड

Patil_p

‘त्याच्या’ षटकाराने फोडली स्वतःच्या कारची काच!

Patil_p

यशस्वी जैस्वालच्या शतकाने मुंबईचा डाव सावरला

Patil_p

भारत-इंग्लंड महिला कसोटीला आज प्रारंभ

Patil_p