Tarun Bharat

जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड कौंटीसाठी उपलब्ध

लंडन / वृत्तसंस्था

दिग्गज इंग्लिश गोलंदाज जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व सकिब महमूद आपापल्या कौंटी संघातर्फे कौंटी चॅम्पियनशिपधील तिसऱया फेरीत खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. स्पर्धेतील तिसऱया फेरीच्या सामन्यांना आजपासून (गुरुवार दि. 21) प्रारंभ होत आहे.

अँडरसन व महमूद लँकेशायरच्या डीव्हिजन वन लढतीत ग्लोसेस्टरशायरविरुद्ध मैदानात उतरतील. ही लढत अमिरात ओल्ड ट्रफोर्डवर होणार आहे. या नॉर्थ-वेस्ट कौंटी संघाने दुसऱया फेरीत केंटविरुद्ध 10 गडय़ांनी विजय मिळवत पूर्ण गुण वसूल केले. त्यांचा हा या हंगामातील पहिला सामना होता.

अनुभवी स्टुअर्ट ब्रॉड नॉटिंगहॅमशायरचे प्रतिनिधीत्व करणार असून या संघाची लढत रिव्हरसाईडवर डरहॅमविरुद्ध होणार आहे. नॉटिंगहॅमशायरने पहिल्या 2 लढतीत 1 विजय व 1 पराभव अशी संमिश्र कामगिरी नोंदवली आहे.

Related Stories

माजी हॉकीपटू एस. व्ही. सुनील निवृत्त

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी उपांत्य लढत आज

Patil_p

शेवटची-निर्णायक कसोटी गुरुवारपासून

Patil_p

मुंबईचीही अंतिम फेरीत जोरदार धडक

Patil_p

प्लेऑफचा चौथा संघ आज ठरणार, दिल्ली-मुंबई आमनेसामने

Patil_p

कोणी टाकला आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू?

Patil_p