Tarun Bharat

जेव्हा धोनीने ‘त्या’ चाहत्याशी संपर्क साधला!

चेन्नई सुपरकिंग्सच्या इतिहासात धोनीच्या नेतृत्वाखालील हा संघ प्रथमच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. आयपीएल स्पर्धेतील सर्व हंगामातील प्रवास पाहता, यंदा प्रथमच पहिल्या चार संघात चेन्नई सुपरकिंग्स दिसून येणार नाही. पण, चाहत्यांचे चेन्नईप्रती आणि धोनीप्रती प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. तामिळनाडूतील कुडलोर येथील गोपालकृष्णन या चाहत्याने आपल्या निवासस्थानालाच चेन्नईच्या जर्सीचा रंग दिला. शिवाय, निवासस्थानाला ‘होम ऑफ धोनी फॅन’ असे नाव दिले. त्याची दखल घेत धोनीने या सुपरफॅनला व त्याच्या कुटुंबियांसाठी खास संदेश दिला.

चेन्नई सुपरकिंग्स संघव्यवस्थापनाने धोनीची प्रतिक्रिया या चाहत्यापर्यंत पोहोचवली. यात धोनी म्हणतो, ‘मी इन्स्टाग्रामवर याबाबतची पोस्ट पाहिली. माझ्या मते हा खूप मोठा सन्मान आहे. त्याचवेळी एक बाब लक्षात येते की, हा केवळ माझाच नव्हे तर चेन्नई सुपरकिंग्स संघाचाही सन्मान आहे. त्यांनी यातून ज्या प्रकारे माझ्याप्रती व चेन्नई प्रँचायझीप्रती प्रेम दर्शवले, त्यातूनच खूप काही दिसून येते, त्यांची समर्पणाची भावना अधोरेखित होते. चेन्नई संघासाठी व माझ्यासाठी प्रेम दर्शवण्यासाठी त्यांनी जे केले, त्याबद्दल मला त्यांचा आदर आहे. मी या निमित्ताने त्यांचे सर्वांचे आभार मानू इच्छितो’.

चेन्नईच्या या सुपरफॅनने आपल्या निवासस्थानाला चेन्नईच्या जर्सीचा रंग देण्यासाठी दीड लाख रुपये खर्ची घातले. शिवाय, बाजूच्या भिंतीवर सीएसकेचा लोगो देखील साकारला. तसेच, ‘व्हिस्टल पोडू’ ही टॅगलाईन लिहिली. काहीच दिवसांपूर्वी वृत्तसंस्थेने तामिळनाडूतील या अनोख्या चाहत्याची प्राधान्याने दखल घेतली आणि ती पोस्ट विविध माध्यमातून प्रसारित होत राहिली. त्यानंतर चेन्नई संघव्यवस्थापन व धोनीने त्याची आवर्जून दखल घेतली आहे.

Related Stories

महिला टी-20 तिरंगी मालिकेला आज प्रारंभ

Patil_p

बेंगळूर एफसीचा ईगल्सवर निसटता विजय

Patil_p

अफगाण क्रिकेट संघ बांगलादेशमध्ये दाखल

Patil_p

स्पेनच्या अल्बर्टो लोपेझला ‘क्लायम्बिंग’चे गोल्ड

Patil_p

विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या रूपरेषेत बदल

Amit Kulkarni

जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये अभिज्ञाला रौप्य पदक

Archana Banage