Tarun Bharat

जेव्हा लाईव्ह टीव्हीवर प्रशिक्षक तिला प्रपोज करतो!

Advertisements

अर्जेन्टिनाची फेन्सर मारिया बेलनला प्रशिक्षक ल्युकासकडून विवाहाचा प्रस्ताव

अवघ्या क्रीडा जगताच्या नजरा सध्या टोकियो ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीमुळे, सर्वच देश पूर्ण ताकदीने पथक पाठवू शकलेले नाहीत. मात्र, या प्रतिकूल स्थितीतही स्मितहास्याची लकेर उमटवणारे काही प्रसंग तेथे अनुभवास येत आहेत. अर्जेन्टिनाची फेन्सर मारिया बेलनला तिचे प्रदीर्घकालीन प्रशिक्षक व मित्र ल्युकास गुलेर्मो यांनी प्रपोज केले, त्यावेळी तिच्या चेहऱयावर देखील अशीच स्मितहास्याची लकेर उमटली.

अर्जेन्टिनाची मारिया महिला गटात हंगेरीच्या ऍना मॉर्टनविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होती. मात्र, याचे थेट प्रक्षेपण सुरु असतानाच मारियाच्या पाठीमागेच असलेल्या तिच्या प्रशिक्षकांनी एक संदेश लिहून तो कॅमेऱयासमोर दाखवला आणि हा मारियासाठी चक्क विवाहाचा प्रस्ताव होता.

कॅमेरामनने तिला क्षणभर मागे वळून पाहण्यास सांगितले आणि मागे वळून हा नजारा पाहताच तिला देखील आश्चर्याचा धक्का बसला. नंतर तिने चटकन होकार दिला आणि जणू सारा माहोलच बदलून गेला.

‘आम्ही दोघे उत्तम मित्र आहोत, उत्तम सहकारी आहोत. विविध स्पर्धांमध्ये एकत्रित थांबत आलो आहोत. आमच्यात वादही होतात. पण, ते तात्कालिक असतात. झालेले मतभेद आम्ही मिटवतो आणि पुढे सरकतो’, असे मारिया आपल्या मैत्रीबद्दल बोलताना म्हणाली.

Related Stories

भारताचा पहिला डाव अवघ्या 202 धावांमध्ये खुर्दा

Patil_p

जागतिक चॅम्पियनशिपचे यजमानपद भारताने गमावले

Patil_p

कोव्हिडविरुद्ध लढा ही एक कसोटीच : कुंबळे

Tousif Mujawar

2011 वर्ल्डकप विजयानंतर नेहराने मागवले होते 40 आम्लेट!

Patil_p

श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाडला संधी शक्य

Patil_p

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा विजयी श्रीगणेशा

Patil_p
error: Content is protected !!