Tarun Bharat

जेष्ठ खगोलशास्त्र शास्त्रज्ञ प्रा. डॉ. आर. व्ही. भोसले यांचे निधन

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

जेष्ठ खगोलशास्त्र शास्त्रज्ञ प्रा डॉ राजाराम विष्णू तथा आर व्ही भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी महागावकर कॉम्प्लेक्स, टाकळा, राजारामपुरी येथे आज दुपारी १ वाजता दुःखद निधन झाले, बस्तवडे, ता. कागल येथे १२ नोव्हेंबर १९२८ येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण म्युन्सिपालटीच्या नागोजीराव पाटणकर शाळेत, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये वास्तव्यास होते. कोल्हापूरमध्ये राजाराम महाविद्यालयात महाविद्यालयिन शिक्षण करून १९५० ला बीएस्सी झाले. एमएसीसाठी एस. पी. कॉलेज पुणे येथे गेले. त्यांनतर अहमदाबाद येथे डॉ. विक्रम साराभाई यांच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे सशोधन सहायक म्हणून रुजू झाले. १९६० मध्ये पी. एचडी समपादन केली.

त्यावेळी भारतातील पहिली रेडिओ टेलीस्कोपिक दुर्बीण तयार केली. १९६१ मध्ये कॅनडा येथे पुढील संशोधनासाठी गेले.त्यांनतर अमेरिकेत नासा साठी ‘व्हिजिटिंग रिसर्च आसोसिऐट ‘म्हणून रुजू झाले. त्यानतर पुन्हा भारतात येऊन पंधरा वर्षे अहमदाबाद येथे सशोधन क्षेत्रात कार्यरत राहिले.

यावेळी डॉ. साराभाई, डॉ. रमानाथन, डॉ. अब्दुल कलाम ,डॉ. युआर राव अशा दिग्गज शास्त्रज्ञांशी सहवास लाभला. १९८८ साली निवृत्तीनंतर कोल्हापूर येथे स्थायिक होवून शिवाजी विद्यापीठामध्ये ऑनररी प्रोफेसर ऑफ स्पेस सायन्स म्हणून कार्यरत झाले, पन्हाळा येथे अवकाश निरीक्षण केंद्र व दुर्बीण, प्रयोगशाळा, वेधशाळा निर्मिती केली, अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव, पंचगंगा प्रदूषण, रंकाळा तलाव संवर्धनासाठी त्यांनी मार्गदर्शन पर काम केले. नांदी पर्यावरण समृद्धीची या उपक्रमाला मार्गदर्शक म्हणून तर मित्र, विज्ञान प्रबोधिनी, निसर्ग मित्र,मराठी विद्यान परिषद आदि संघटनासह कार्यरत होते.

Related Stories

अजिंक्यतारा पुन्हा होरपळला….

Patil_p

मुंबईच्या समुद्रात दोन जहाजं भरकटली; ४१० जणांचे प्राण संकटात

Archana Banage

ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने घेतला अखेरचा श्वास

Abhijeet Khandekar

राजाराम कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून खलबते सुरु

Archana Banage

अण्णा लेवे यांनी केली अर्थसंकल्पाबाबत नगरविकास खात्याकडे तक्रार

Patil_p

फौंड्री उद्योगात डिजिटलायझेनची गरज

Archana Banage
error: Content is protected !!