Tarun Bharat

जेष्ठ पत्रकार राघवेंद्र जोशी यांचे निधन

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील नाडोज या कन्नड दैनिकाचे संस्थापक व ज्ये÷ पत्रकार राघवेंद्र अरविंदराव जोशी (वय 78) यांचे सोमवारी सकाळी हृदयाघाताने निधन झाले. नेहमीप्रमाणे ते फिरायला गेले होते. फिरुन भाग्यनगर येथील घरी पोहोचल्यानंतर ते अचानक कोसळले व त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पालकमंत्री रमेश जारकीहोळी आदी नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त केला आहे.

8 डिसेंबर 1942 रोजी त्यांचा जन्म झाला होता. बीएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई येथील एका खासगी कंपनीत चार वर्षे सेल्समन म्हणून त्यांनी काम केले होते. नाडोजनंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘निर्भित’ साप्ताहिक सुरू केले होते. पत्रकारीतेतील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

Related Stories

मनपा वॉर्ड पुनर्रचनेबाबत नोंदविला आक्षेप

Amit Kulkarni

गाडीवाला आया देखो, घरसे कचरा निकालो

Amit Kulkarni

निम्मी रक्कम भरण्याच्या ग्वाहीनंतर मटण मार्केट खुले

Patil_p

टिळकवाडीत 12 लाखांची घरफोडी

Amit Kulkarni

ड्रेनेज चेंबरचे झाकण खराब झाल्याने प्रवाशांना धोका

Amit Kulkarni

तिसरे रेल्वेगेट उद्या राहणार बंद

Amit Kulkarni
error: Content is protected !!