Tarun Bharat

जेष्ठ वकील एस.बी.शेख यांचा सत्कार

प्रतिनिधी/ बेळगाव

जेष्ठ वकील एस. बी. शेख यांना नुकतीच अर्जेंटिना येथील सेंट पॉल्स युनिव्हर्सिटीची पीएचडी मिळाली आहे. यापूर्वीही त्यांना दोन पीएचडी मिळाल्या होत्या. त्याबद्दल वकिलांनी त्यांचा सत्कार केला आहे.

बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सी. टी. मजगी, ऍड. आय. ए. तल्लूर, कोमल हन्नीकेरी, प्रवीण हिरेमठ, ए. एम. पाटील, यशोधर कोटियान, अप्सरा शेख यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात आला. ज्ये÷ वकील एस. बी. शेख यांनी 16 पुस्तके लिहिली आहेत. वकिली पेशा करत असताना त्यांनी ही पुस्तके लिहिली. त्याबद्दल विविध विद्यापीठांनी त्यांची दखल घेतली आहे. जिवा टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट दिली होती. त्यानंतर जर्मनी येथील विद्यापीठानेही त्यांना पीएचडी दिली होती.

तीन वेळा त्यांना पीएचडी मिळाली आहे. याबद्दल विशेष कौतुक होत आहे. त्यांनी लिहिलेल्या आणखी एका पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार असल्याचे सांगण्यात आले..

Related Stories

भंडाऱयाची उधळण, हालसिद्धनाथांचा गजर

Amit Kulkarni

‘विद्यागम’ला कायमचा बेक दिल्यास मोठे नुकसान

Patil_p

उत्तर भागातील पाणीपुरवठय़ात व्यत्यय

Patil_p

कॅन्टोन्मेंटमध्ये आता आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र सुरू होणार

Amit Kulkarni

जेष्ठ पत्रकार राघवेंद्र जोशी यांचे निधन

Patil_p

छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी गांभीर्याने

Amit Kulkarni