Tarun Bharat

जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचं निधन

Advertisements

नागपूर/प्रतिनिधी

जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचं नागपूरमध्ये निधन झालंय. ७९ व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून राम लक्ष्मण यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी पहाटे त्यांची प्राण ज्योत मालवली. शनिवारी दुरापी १२ वाजता जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांच्या प्रार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूर सोडून मुंबईला आले. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत प्रवेश तर मिळवला. त्यांनी आपल्या कार्याच्या जोरावर स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून ते प्रसिद्धीस आले. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली आहेत. ८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती.

Related Stories

वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी खर्च करणार दरवर्षी अडीच हजार कोटी

Rohan_P

रावणाने 5 हजार वर्षापूर्वी केले पहिले विमान उड्डाण; श्रीलंकेचा दावा

datta jadhav

सातारलाही बनावट क्रीडाप्रमाणपत्राच्या संसर्गाची बाधा!

Patil_p

महाराष्ट्रातील लॉकडाऊन सरसकट उठवणार नाही, शिथिलता देण्यात येणार – राजेश टोपे

Abhijeet Shinde

चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बोलतात; त्यांना मनावर घेऊ नका – जयंत पाटील

Abhijeet Shinde

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खुनाचा गुन्हा दाखल करा : आंबेडकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!