Tarun Bharat

जेष्ठ साहित्यिक डॉ.गवस यांच्या मुलगा व मुलीच्या नावे व्हाट्सअप अकाउंट काढत अनेकांना फसविले

भुदरगड पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ


प्रतिनिधी / गारगोटी


जेष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या मुलगा व मुलीच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाउंट उघडून अनेक मुलींना त्रास देणार्‍या ठगावर पोलीसांनी महिना लोटला तरी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. जेष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी तक्रार अर्ज दाखल करून तब्बल एक महिना लोटला तरी तपासाच्या नावाखाली भुदरगड पोलीसांची टाळाटाळ सुरु असुन अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. ठग मोकाटच आहे. त्यामुळे भुदरगड पोलीसांच्या कामकाजा बद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

भुदरगड तालुक्यातील एका युवकाने डॉ. राजन गवस यांच्या मुलगा व मुलीच्या मोबाइल क्रमांकावरून (9322617599) बनावट व्हाट्सअप अकाउंट तयार केले आहे. या अकाउंटवर त्यांनी डॉ. गवस यांच्या कुटूंबियांचा फोटो लावला आहे. या अकाउंटवरून तो गेल्या दिड ते दोन वर्षापासुन अनेक मुलींशी, मुलाशीं चॅटींग करीत आहे. आपण डॉ. गवस यांच्या घरी राहत असुन पुस्तक लिहित असल्याचा कांगावा करत होता. तसेच पुण्यामध्ये डॉ. गवस यांच्या मुलीच ऑफीस असुन या ठिकाणी पुस्तक प्रकाशित केली जातात. या ऑफीसमध्ये जॉब असल्याचे तो मुलींना सांगुन जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होता. दोन मुलींना त्यांने बँकेचे धनादेश देखील दिले आहेत. मुलीशी चॅटींग करतांना डॉ. गवस यांची मुलगी चॅटींग करते असे तो भासवत होता. मोबाइलवर तो स्वत: बोलत नव्हता. फक्त चॅटींग करत होता. त्यामुळे मुलींना ही गोष्ट लक्षात येत नव्हती.

गेल्या महिण्यात एका चाणाक्ष युवतीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने डॉ. गवस यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर डॉ. गवस यांनी 24 जुन रोजी भुदरगड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. महिना होत आला तरी पोलीसांकडून तपास सुरु असल्याचे सांगीतले जात आहे. अद्याप त्या तरूणावर गुन्हा दाखला झालेला नाही किंवा सखोल तपास झालेला नाही. या तरूणाने मुंबाई, पुणे या ठिकाणी नोकरी लावतो, अशी खोटी बतावणी करून अनेक मुलींना फसविल्याची चर्चा आहे. एका जेष्ठ साहित्यिकाच्या तक्रारी बाबत इतकी दिरंगाई लागत असेल तर सामान्यांचे काय ? असा प्रश्‍न या निमित्ताने उभा राहत आहे.

दरम्यान याबाबत प्रतिक्रियेसंदर्भात सहाय्यक पोलीस निरिक्षक सतीश मयेकर यांच्याशी संपर्क साधला असता सुट्टीवर असुन उद्या या बाबत बोलू असे सांगितले.

Related Stories

पाकमध्ये पडलेल्या क्षेपणास्त्राबाबत राज्यसभेत निवेदन सादर; संरक्षणमंत्री म्हणाले…

datta jadhav

पारा चढला; सातारकर घामाघुम

Patil_p

छत्रपती शिवाजी स्टेडियमवरील जलतरण तलाव पुन्हा खुला

Abhijeet Khandekar

शिवसेनेचा ‘हा’ मंत्री भाजप नेत्याच्या घरी, तर्कवितर्कांना उधाण

Archana Banage

उत्तर प्रदेशमध्ये डेल्टा नंतर आढळले कप्पा विषाणूचे रुग्ण!

Tousif Mujawar

रस्त्याअभावी मातेसह नवजात बालकाला मृत्यूने गाटले

Archana Banage