Tarun Bharat

जेसन रॉय इंग्लंड वनडे संघात

Advertisements

शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार पहिला सामना

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया वनडे मालिकेसाठी इंग्लंडने जेसन रॉयचा संघात समावेश केला आहे. स्नायुदुखापतीतून आता तो पूर्ण बरा झाला आहे.

सरावावेळी त्याला ही दुखापत झाली होती. त्यामुळे या स्फोटक सलामीवीराला पाक व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकांत खेळता आले नव्हते. डेविड मलानने या मालिकात चांगली कामगिरी करून आयसीसी क्रमवारीत पहिले स्थानही पटकावले. मात्र त्याला आता राखीव खेळाडूंत ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका इंग्लंडने 2-1 अशा फरकाने जिंकली असून शुक्रवारपासून वनडे मालिका याच मैदानावर सुरू होणार आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदाच वनडेत मुकाबला होत आहे.

Related Stories

विश्वचषक महिलांच्या हॉकी स्पर्धेला आज प्रारंभ

Amit Kulkarni

थिसारा परेराचे षटकात 6 षटकार

Patil_p

सचिनला लाबुशानेत दिसते स्वतःचे प्रतिबिंब!

Patil_p

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा ग्रीनबरोबर मध्यवर्ती करार

Patil_p

जपानचा बॅडमिंटनपटू मोमोटा कोरोनाबाधित

Patil_p

हिमा दासची पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती

Patil_p
error: Content is protected !!