Tarun Bharat

जेसॉन रॉयची आयपीएलमधून माघार

Advertisements

पहिल्यावहिल्या आयपीएल हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला धक्का

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसॉन रॉयने आगामी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली असून यामुळे गुजरात टायटन्स या नव्या प्रँचायझीला प्रत्यक्ष स्पर्धा काही आठवडे दूर असतानाच मोठा धक्का बसला. सातत्याने बायो-बबलमध्ये खेळणे कठीण असल्याचे सांगत त्याने हा निर्णय घेतला. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, जेसॉन रॉयने मागील आठवडय़ात आपल्या प्रँचायझीला या निर्णयाची माहिती दिली. टायटन्स व्यवस्थापन आता त्याच्याऐवजी दुसऱया उत्तम सलामीवीराच्या शोधात आहे.

जन्माने दक्षिण आफ्रिकन असलेल्या 31 वर्षीय जेसॉन रॉयला गुजरात टायटन्सने मेगा ऑक्शनमध्ये 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर करारबद्ध केले होते. मात्र, या संघात शुभमन गिलसह जेसॉन हा एकमेव स्पेशालिस्ट ओपनर असल्याने त्याची गैरहजेरी त्यांना प्रकर्षाने जाणवणार आहे.

जेसॉन रॉयने एखाद्या आयपीएल हंगामातून माघार घेण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याने यापूर्वी 2020 मध्ये देखील वैयक्तिक कारणाचा दाखला देत माघार घेतली. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सने रॉयला 1.5 कोटी रुपये मोजत करारबद्ध केले होते. यंदा 15 व्या आवृत्तीची आयपीएल स्पर्धा दि. 26 मार्चपासून खेळवली जात असून मे महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात त्याची सांगता होणार आहे.

मागील आयपीएल हंगामात जेसॉन रॉयने सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करताना काही दर्जेदार डाव साकारले आणि यंदा पाकिस्तान सुपर लीगमध्येही (पीएसएल) त्याने तोच फॉर्म कायम राखला होता. पीएसएलमध्ये जेसॉन रॉयने क्वेटा ग्लॅडिएटर्सचे प्रतिनिधीत्व केले आणि ही स्पर्धा देखील बायो-बबलमध्ये खेळवली गेली होती.

ग्लॅडिएटर्सतर्फे त्याने केवळ 6 सामने खेळले. पण, तरीही 50.50 ची सरासरी आणि 170.22 च्या स्ट्राईक रेटने त्याने संघातर्फे सर्वाधिक 303 धावांची आतषबाजी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये नेहमीच्या 8 ऐवजी 10 संघ समाविष्ट असून प्राथमिक टप्प्यातील सर्व सामने मुंबई व पुण्यात खेळवले जाणार आहेत.

Related Stories

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे सराव सामने

Patil_p

आयसीसी कसोटी मानांकनात कोहली-विल्यम्सन संयुक्त दुसऱया स्थानी

Patil_p

भारतीय बुद्धिबळ संघाला संमिश्र दिवस

Patil_p

टी-20 क्रमवारीत केएल राहुलची दुसऱया स्थानी झेप

Patil_p

ऍलीयासिमे- सित्सिपस अंतिम लढत

Patil_p

‘खेलो इंडिया’ विद्यापीठ क्रीडा स्पर्धा बेंगळुरात

Patil_p
error: Content is protected !!