एकाला अटक, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजापूर तालुक्यातील जैतापूर-चव्हाणवाडी येथे राज्य उत्पादन शुल्कच्या धडक कारवाईत लाखो रूपयांचा अनिधिकृत माडीसाठा जप्त करण्यात आल़ा या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आल़ी संजय मंगलदास करगुटकर (ऱा जैतापूर चव्हाणवाडी) असे या संशयिताचे नाव आह़े
या बाबत उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील जैतापूर-चव्हाणवाडी येथे अनधिकृतरित्या माडीचा साठा असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होत़ी त्यानुसार गुरूवारी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शरद जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येथे छापा मारल़ा यावेळी संजय करगुटकर यांच्या गोदामामध्ये 1 लाख 18 हजार 390 किंमतीचा 2 हजार 235 लिटर माडीचा साठा आढळून आल़ा
या प्रकरणी करगुटकर याच्याकडे माडीसाठय़ासंदर्भात चौकशी करण्यात आली असता त्याच्याजवळ कोणताही अधिकृत परवाना मिळून आला नाह़ी तसेच माडीसाठय़ासदर्भात कोणतेही समाधानकारक उत्तर देवू शकला नसल्याने त्याच्याविरूद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, जवान विशाल विचारे, सागर पवार यांनी केल़ी