Tarun Bharat

जैन युवा संघटनेच्या सदस्यत्व नोंदणीला प्रारंभ

अलारवाड-हलगा येथे देण्यात आली चालना

प्रतिनिधी / बेळगाव

जैन समाजातील युवकांच्या एकजुटीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जैन युवा संघटनेच्या सदस्यत्व अभियानाला अलारवाड व हलगा येथे चालना देण्यात आली. समाजातील युवकांनी सदस्यत्व नोंदणी करुन संघटना बळकट करावी, असे आवाहन संघटनेचे प्रमुख कुंतिनाथ कलमनी यांनी केले आहे.

जैन समाजातील युवक माहिती अभावी अनेक योजनांपासून वंचित राहिले आहेत. विकासापासूनही ते दूर राहिले आहेत. त्यामुळे समाजातील काही युवकांच्या पुढाकारातून जैन युवा संघटनेची स्थापना करण्यात आली असून ही संघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना अभय अवलक्की म्हणाले, जैन समाजाचा विकास, धार्मिक आचरण आदींसाठी तरुणांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कारण अनेक गोष्टींपासून तरुणाई दूर होत चालली आहे. समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे.

यावेळी किरण कलकुप्पी, उदय पद्मण्णावर, किरण समय, अजित पद्मण्णावर, अलारवाड येथील बाहुबली जनगौडा, सुनील जनगौडा, आप्पान्ना जिनगौडा, रवी मजगावी, अभिनंदन पाटील, नेमीनाथ पुनजगौडा, हलगा येथील धनू देसाई, संदीप सैबण्णावर, सुकुमार हुडेद, महावीर बस्तवाड, अशोक पायक्का आदी उपस्थित होते.

Related Stories

भरतेश कॉमर्स कॉलेजमध्ये सावन महोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

बडेकोळमठात रथोत्सव मिरवणूक उत्साहात

Amit Kulkarni

कडोलीत मास्टरप्लॅन, पण विद्युत खांब रस्त्यावर

Patil_p

साहेब नाहीत, नंतर या!

Amit Kulkarni

बेशुध्द अवस्थेत आढळलेल्या अनोळखी वृध्दाचा मृत्यू

Patil_p

प्रत्येक चित्रांमध्ये जाणवतोय जिवंतपणा!

Patil_p
error: Content is protected !!