Tarun Bharat

‘जैश’च्या 3 दहशतवाद्यांचा अवंतीपोरामध्ये खात्मा

मागील तीन दिवसात सहा जण यमसदनी

श्रीनगर / वृत्तसंस्था

काश्मीरच्या पुलवामा जिल्हय़ात अवंतीपोरामध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्रालच्या जंगली भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. दहशतवाद्यांकडून दोन एके-47 रायफल, एक एसएलआर जप्त करण्यात आले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव वाकील शाह असे आहे. भाजप नेते राकेश पंडिता यांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या तीन दिवसात खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 6 वर पोहोचला आहे.

दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीर जिह्यातील नागबेरान त्रालच्या जंगल परिसरात पर्वतीय भागात घेराव आणि शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले गेले. मात्र, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करताच चकमक सुरू झाली. त्यांनी सैनिकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केल्यानंतर तीन दहशतवादी ठार झाले.

पुलवामात 2 दहशतवाद्यांचा खात्मा

यापूर्वी शुक्रवारी जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पंपोरच्या ख्रू भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. यात दोन दहशतवादी ठार झाले. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. खरुचा मुसैब अहमद भट्ट आणि मुजामिल अहमद राथर अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. भट्ट याच्यावर नागरिकांच्या छळासह अनेक दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केल्याचा ठपका आहे.

राजौरीमध्ये 1 दहशतवादी ठार, जेसीओ हुतात्मा

राजौरीमध्ये गुरुवारी झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले होते. या चकमकीत लष्कराचे एक जेसीओही हुतात्मा झाले होते. राष्ट्रीय रायफल्सच्या जेसीओला चकमकीत गोळय़ा लागल्यानंतर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

Related Stories

मणिपूरमध्ये 5 दिवस इंटरनेट बंद

Patil_p

भारतातील रस्ते २०२४ पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे – नितीन गडकरी

Abhijeet Khandekar

मुस्लिमांना आवाहन, ममतांना नोटीस

Amit Kulkarni

दिल्लीत 1,935 नवे कोरोना रुग्ण; 47 मृत्यू

Tousif Mujawar

मध्यमवर्गाला वैद्यकीय विम्याची गरज

Patil_p

तेजस्वी यादवांनी ख्रिश्चन मुलीशी विवाह केल्याने मामा साधू यादव संतापले; म्हणाले, बिहारमध्ये आल्यास…

Archana Banage