Tarun Bharat

जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याला कंठस्नान

Advertisements

जम्मू / वृत्तसंस्था

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या शम सोफी याला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात झालेल्या चकमकीत भारताच्या सैनिकांनी कंठस्नान घातले आहे. पुलवामाच्या तिलवानी क्षेत्रात दहशतवादी लपलेले आहेत अशी माहिती गुप्तचरांनी दिल्याने सैनिकांनी या भागात शोधकार्य सुरु केले होते. त्यावेळी वनभागात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला चोख प्रत्युत्तर देताना सैनिकांनी सोफी याला ठार केले.

श्रीनगर भागात एनआयएने टाकलेल्या धाडींमध्ये दहशतवाद्यांचे चार साथीदार हाती लागले आहेत. वसीम अहमद सोफी, तरिक अहमद दर, बिलाल अहमद मीर आणि तारिक अहमद बाफंडा अशी त्यांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत त्यांचे विविध दहशतवादी संघटनांशी असणारे कनेक्शन उघड झाले आहे.

या चौघांना दहशतवादी संघटनांची कार्यपद्धती आणि योजना यांची बरीच माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची अटक ही महत्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक नागरीकांवर हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पोलिस, अर्थसैनिक दले आणि सैनिक तुकडय़ांनी गस्त  वाढविली असून हिंसाचार माजविण्याच्या किमान तीन योजना हाणून पाडल्या आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये एकंदर आठ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

Related Stories

हेलिकॉप्टर, 1 कोटी रुपये रोख, तीनमजली घराचे आश्वासन

Amit Kulkarni

मणिपूरमध्ये उग्रवाद्यांच्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू

Patil_p

अखिलेश यादव आणि आझम खान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

Abhijeet Khandekar

जेएनपीटी बंदरात ३०० कोटींचे हेरॉईन जप्त

Patil_p

…तर आम्ही तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करु : अरविंद केजरीवाल

Tousif Mujawar

भारतीय अधिकाऱयांनी घेतली कुलभूषण जाधवांची भेट

Patil_p
error: Content is protected !!