Tarun Bharat

जॉन्सन फर्नांडिस यांचा ‘टीएमसी’त प्रवेश

अन्य 100 कार्यकर्तेही सामील

प्रतिनिधी /पणजी

मडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जॉन्सन फर्नांडिस यांनी काल मडगाव येथे  टीएमसीच्या गोवा सह-प्रभारी सुश्मिता देव आणि स्थानिक नगरसेवक महेश आमोणकर यांच्या उपस्थितीत गोवा ‘टीएमसी’मध्ये प्रवेश केला. यावेळ महेश आमोणकर यांच्या 100 पेक्षा अधिक समर्थकांनादेखील पक्षात सामील करण्यात आले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना जॉन्सन फर्नांडिस म्हणाले, मी आता गोवा ‘टीएमसी’चा सदस्य झाल्याचा आनंद आहे. गोव्यातील महिला आणि युवकांसाठी सुरू केलेल्या योजनांमुळे मी प्रभावित झालो आहे.

‘टीएमसी’च्या गोवा सह-प्रभारी तथा राज्यसभा खासदार सुश्मिता देव म्हणाल्या, माझा प्रशासनावर विश्वास आहे, नगरपालिका किंवा पंचायतीमधून येणारे लोक हेच खरे तळागाळातील नेते आहेत. अशा तळागाळातील नेत्यांची तृणमूलकडून नेहमीच  दखल घेतली जाते.

‘गृहलक्ष्मी कार्ड’ला गोव्यात प्रतिसाद

महिलांना सक्षम बनवणाऱया ‘गृहलक्ष्मी कार्ड’ला गोव्यात प्रतिसाद मिळाला आहे. युवकांवर मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारीचे संकट असताना, आमची ‘युवा शक्ती’ योजना त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयांचे कर्ज देते. अनेक सरकारे आली. मात्र अपेक्षित विकास झाला नाही.  ‘टीएमसी’ची सत्ता गोव्यात आल्यास नक्कीच सुशासन आणि विकासाची हमी देत असल्याचे सुश्मिता देव म्हणाल्या.

Related Stories

देवाबाग येथे पार्क केलेल्या बुलेटला आग दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयातील वादळी वाऱयाचा फटका. नैसर्गिक पडझड, वाहंनाची नुकसानी,वीजयंत्रणेचे नुकसान

Omkar B

केरये खांडेपार येथील श्री विष्णू सोमनाथ – एक जागृत देवस्थान

Amit Kulkarni

कुणाचीही गुंडागिरी, दहशत खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री

Amit Kulkarni

आमदार कार्यशाळेवर 25 लाखाची उधळपट्टी

Amit Kulkarni

मांद्रे येथील मंगेश स्टोअर्सला आग लागून आठ लाखांचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!