Tarun Bharat

जॉन डायसवर चांदर येथे अंत्यसंस्कार

Advertisements

प्रतिनिधी/ मडगाव

अमेरिकेत एका अज्ञात हल्लेखोराने गोळी मारून हत्या करण्यात आलेल्या चांदर येथील जॉन डायस या तरुणाचा मृतदेह गोव्यात पोचल्यानंतर काल शनिवारी शोकाकूल वातावरणात चांदर येथे दफनविधी करण्यात आले. जॉन डायस याचा मृतदेह घरी पोचल्यानंतर अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांचा देखील समावेश होता.

टेक्सास प्रांतातील ह्युस्टन येथे एका लुटारूकडून झालेल्या गोळीबारात जॉनचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह पहाटे गोव्यात पोहोचला व संध्याकाळी 4 चार वाजता दफनविधी करण्यात आले. गेल्या 10 दिवसांपासून जॉनचा मृतदेह गोव्यात आणण्यासाठी गोवा सरकारसह एनआरआय कमिशनचे प्रयत्न सुरु होते. अखेर सरकारच्या प्रयत्नांना यश आलं आहे. दफनविधी करण्यापूर्वी चांदर येथील चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली.

जॉनची आई इनासिन्हा डायस आपल्या मुलाला पाहण्यासाठी व्याकूळ झाल्या होत्या. मुलाचा मृतदेह घरी पोचताच तिने आपल्या भावनाना वाट मोकळी करून दिली.  जॉनच्या मृत्यूने डायस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मारेकऱयाला शोधण्यासाठी 5 हजार डॉलरचे बक्षीस

गोमंतकीय तरुणाच्या मारेकऱयाला शोधण्यासाठी अमेरिकेत 5 हजार डॉलरचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ह्युस्टन पोलिसांकडून अज्ञात मारेकऱयाचा शोध सुरू असून जॉनच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

अमेरिकेतील पोलिसांनी जॉन डायस या गोमंतकीय तरुणाच्या मारेकऱयाची माहिती देणाऱयाला 5 हजार डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे.

अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एक मास्कधारी व्यक्ती बराच वेळ जॉन काम करत असलेल्या गॅस स्टेशनच्या बाहेर घुटमळत होता. काळय़ा रंगाचे कपडे घातलेल्या व्यक्तीने अचानक दुकानात प्रवेश केला आणि काऊंटरवर असलेल्या जॉनवर गोळय़ा झाडल्या. जॉनची हत्या करुन मास्कधारी व्यक्ती दुकानातून पळून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचंही अमेरिकी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

Related Stories

अवेडे येथे 4.78 लाखांची दारू जप्त

Amit Kulkarni

गोवा – दिल्लीचे वीजमंत्री 26 रोजी आमने-सामने

Amit Kulkarni

मिरामार रोटरी क्बचे अधिकारग्रहण

Amit Kulkarni

लोकायुक्ताना न जुमानणाऱया लोकप्रतिनिधींची नावे जाहीर

Amit Kulkarni

नगरपालिकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

Amit Kulkarni

भाजपाने उमेदवारी नाकारल्यास, फोंडय़ातून स्वतंत्र लढणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!