Tarun Bharat

जॉफ अलार्डाईस आयसीसीचे नवे सीईओ

Advertisements

वृत्तसंस्था/ दुबई

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (आयसीसी) कायमस्वरुपी सीईओपदी ऑस्ट्रेलियाच्या जेफ ऍलार्डाईस यांची नियुक्ती झाली. यापूर्वी ऍलार्डाईस हे 8 महिन्यांच्या कालावधीसाठी आयसीसीच्या हंगामी सीईओपदी कार्यरत होते.

यापूर्वी आयसीसीचे सीईओपद मनू साहनी यांच्याकडे सोपविण्यात आले होते. गेल्या जुलैमध्ये साहनी यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या पदावर हंगामी स्वरुपी ऍलार्डाईस यांची नियुक्ती करण्यात आली होती. क्रिकेटचा प्रसार जागतिक स्तरावर करण्यासाठी सीईओपदाची जबाबदारी कायमस्वरुपी ऍलार्डाईस यांच्यावर आयसीसीने टाकली आहे. ऍलार्डाईस हे ऑस्ट्रेलियाचे माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. आयसीसीच्या सरव्यवस्थापक पदाची सूत्रे ऍलार्डाईस यांनी यापूर्वी आठ वर्षे सांभाळली आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सरव्यवस्थापक म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली आहे.

Related Stories

आंतरराष्ट्रीय शूटर चंद्रो तोमर यांचे निधन

Tousif Mujawar

युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धा रद्द

Patil_p

भारतीय फुटबॉल संघ दुबईला रवाना

Patil_p

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

Amit Kulkarni

विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेतून मॉर्गन बाहेर

Patil_p

लंकेचा ऑस्ट्रेलियावर सहा गडय़ांनी दणदणीत विजय

Patil_p
error: Content is protected !!