Tarun Bharat

जॉय काकोडकर तिसवाडी बुद्धिबळ रॅपीड स्पर्धेचा विजेता

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या ऑफलाईन खुल्या रॅपीड बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद जॉय काकोडकर याने मिळविले. स्पर्धेचे आयोजन महालक्ष्मी हिंदू वाचन मंदिरात करण्यात आले होते. जेतेपद मिळविताना जॉयने अपराजित राहताना सात राऊंडमधून 6.5 गुणांची कमाई केली.

5.5 गुणानी वुमन कँडिडेट मास्टर स्वॅरा ब्रागांझाने दुसरे स्थान प्राप्त केले. तिसरे स्थान 5 गुणानी लव काकोडकरला मिळाले. प्रतीक बोरकर, वेदांत आंगले, आर्या दुबळे, श्रेयश हवाल, वरद शिरोडकर, आयडन जिझस सावियो आणि के. तुषार यांनी त्यानंतरची स्थान मिळविली.

या व्यतिरिक्त आदित्य दुबळे, विहान तारी, आर्यन बॅनर्जी, इथॅन सिल्वेरा, नॅथन फाचो, लिया सिल्वेरा, मृगजा सरदेसाई, रेडन प्रँक, धर्मादित्य नाईक, श्रीवल्ली गांधी, कामाक्षी मणेरकर, अथर्व नितीन नारायण, सोहम रायकर, ऍलना आंद्राद व विरजा देसाई यांना वयोगटात बक्षीसे मिळाली.

स्पर्धा आंगले कुटूंबियांनी बाळकृष्ण शिवा पै आंगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कृत केली होती. बक्षीस वितरण अवधूत आंगले यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी आरस, महेश कांदोळकर, दत्ताराम पिंगे, अरविंद म्हामल, ज्ञानेश्वर नाईक, सत्यवान हरमलकर, विश्वास पिळर्णकर, नरेश पेडणेकर आणि नंदिनी म्हामल यांची उपस्थिती होती.

Related Stories

माशेलातील सुखठणकर कुटूंबीय जपतात दोन श्रींच्या पूजनाची प्रथा

Amit Kulkarni

स्वामी स्वरुपानंदजी यांची 7 पासून फोंडय़ात प्रवचने

Patil_p

श्रीपादभाऊंच्या उपचारांसाठी दिल्लीहून तज्ञ डॉक्टर दाखल

Omkar B

बांदोडा महालक्ष्मी मंदिरात भजनी सप्ताहाला प्रारंभ

Amit Kulkarni

तृणमूल काँग्रेसचे नेते गोव्यात दाखल

Omkar B

तिस्क उसगांव येथे बेशिस्त पार्किंगवर तोडगा काढणार

Amit Kulkarni