Tarun Bharat

जोकोविच, मरे यांची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ दुबई

एटीपी टूरवरील येथे सुरू झालेल्या दुबई खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड नोव्हॅक जोकोविच आणि ब्रिटनचा अँडी मरे यांनी एकेरीत विजयी सलामी दिली.

2022 च्या टेनिस हंगामामध्ये जोकोविचने आपला पहिलाच सामना खेळताना विजय नोंदविला. जोकोविचने या स्पर्धेत वाईल्डकार्डधारक टेनिसपटू मुसेटीचा 6-3,  6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱया एका सामन्यात ब्रिटनच्या माजी टॉप सीडेड अँडी मरेने ख्रिस्टोफर ओकोनलचा 6-7 (5-7), 6-3, 7-5 असा पराभव केला. अँडी मरेचा आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हा 700 वा विजयी सामना आहे. या सामन्यात मरेला विजयासाठी तब्बल तीन तास झगडावे लागले. दुसऱया एका सामन्यात फिलीप क्रेजिनोव्हिकने मॅलेक जेझारीचा 6-7, 6-2, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. हा सामना सव्वा दोन तास चालला होता.

Related Stories

गोविंद उपउपांत्यपूर्व फेरीत, निशांत दुसऱया फेरीत

Amit Kulkarni

आयोजक म्हणतात, पुढील वर्षीही ऑलिम्पिक होणे कठीण!

Tousif Mujawar

विंडीजलाही स्कॉटलंडकडून पराभवाचा धक्का

Amit Kulkarni

भारतीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलियाला रवाना

Patil_p

टोकियो ऑलिंपिकसाठी रेफ्युजी संघनिवड जूनमध्ये

Amit Kulkarni

मँचेस्टर युनायटेड युरोपा लीगच्या उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!