Tarun Bharat

जोकोविच मानांकनात पुन्हा अग्रस्थानी

वृत्तसंस्था/ पॅरीस

सोमवारी येथे घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने पुन्हा अग्रस्थानावर झेप घेतली आहे.s एटीपीच्या मानांकनात जोकोविचने 370 आठवडे आपले अग्रस्थान कायम राखले आहे. या ताज्या मानांकन यादीत नदालचे स्थान घसरले असून तो आता पाचव्या स्थानावर आहे.

Advertisements

एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाचा जोकोविच 8660 गुणांसह पहिल्या, रशियाचा मेदव्हेदेव 7990 गुणांसह दुसऱया, जर्मनीचा व्हेरेव्ह 7200 गुणांसह तिसऱया, ग्रीसचा सित्सिपस 6170 गुणांसह चौथ्या, स्पेनचा नदाल 5525 गुणांसह पाचव्या, स्पेनचा अलकॅरेझ 4770 गुणांसह सहाव्या, रशियाचा रूबलेव्ह 3945 गुणांसह सातव्या, नॉर्वेचा ख्रिस रूड 3940 गुणांसह आठव्या, कॅनडाचा ऍलीसिमे 3850 गुणांसह नवव्या आणि इटलीचा बेरेटेनी 3805 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. या ताज्या मानांकन यादीत प्रतिनिधीत्व करणाऱया रशिया आणि बेलारूसच्या टेनिसपटूंना या दोन्ही देशांच्या ध्वजाचा किंवा नावाचा वापर करता येणार नाही, असे एटीपीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Related Stories

पाँटिंग कुटुंबियांतील सदस्याला कोरोनाची बाधा

Patil_p

युरो फुटबॉल प्लेऑफ लढती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये

Patil_p

पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द

Patil_p

अमेरिकन टेनिस स्पर्धेतून कुझेनत्सोव्हाची माघार

Patil_p

कॅनडा एटीपी चषकाचा मानकरी

Patil_p

इंग्लंडच्या आर्चरची दुखापत पुन्हा चिघळली

Patil_p
error: Content is protected !!