Tarun Bharat

जोकोव्हिचकडून बेलकेन टेनिस स्पर्धेची घोषणा

वृत्तसंस्था/ बेलकेन

जागतिक स्तरावरील कोरोना महामारी संकटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व टेनिस स्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्यात आल्याने बऱयाच टेनिसपटूंना स्वगृहीच राहावे लागत आहे. व्यावसायिक टेनिस क्षेत्र पुन्हा लवकर सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान सर्बियाचा टॉप सीडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोव्हिचने बेलकेन विभागीय टेनिस स्पर्धेची घोषणा केली आहे.

सदर टेनिस स्पर्धा 13 जून ते 5 जुलै दरम्यान घेतली जाणार आहे. बेलकेन विभागीय टेनिस मालिकेमध्ये ऑस्ट्रीयाचा थिएम तसेच अन्य काही टेनिसपटू सहभागी होणार असल्याचे जोकोव्हिचने सांगितले.

कोरोना संकटामुळे मार्चच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सर्व टेनिस स्पर्धा तहकूब केल्या होत्या. आता ऑगस्टमध्ये टेनिस स्पर्धा पुन्हा सरू केल्या जाणार आहेत. कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व नियमांचा काटेकोरपणे अवलंब करत जोकोव्हिक तसेच अन्य काही टेनिसपटूंनी सरावाला प्रारंभही केला आहे.

जर्मनी आणि अमेरिकेत प्रेक्षकविना बंदीस्त टेनिस कोर्टवर काही प्रदर्शनीय टेनिस स्पर्धा घेतल्या गेल्या आहेत. बेलकेन टेनिस स्पर्धा बेलग्रेडमध्ये 13 जूनला सुरू होईल, असे 33 वर्षीय जोकोव्हिचने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या स्पर्धेत आठ टेनिसपटूंचा सहभाग असून बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह, झुमूर सहभागी होणार आहे. 2020 च्या टेनिस हंगामात जोकोव्हिकने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्याचे हे 17 वे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद आहे. बेलकेन टेनिस स्पर्धेत  केनिन, अँड्रेस्क्यू यांचाही सहभाग राहील, असे जोकोव्हिचने म्हटले आहे.

Related Stories

रशियाचा बल्गेरियावर विजय

Patil_p

इंडियाना वेल्स ओपन टेनिस स्पर्धा लांबणीवर

Patil_p

हॉकी इंडियाची बैठक 13 मे रोजी

Patil_p

बांगलादेशची न्यूझीलंडवर 73 धावांची आघाडी

Patil_p

दसऱयाआधीच दिवाळी! दुबईचा हिशेब दुबईतच चुकता!

Patil_p

शिखर धवनच्या 10 हजार धावा

Patil_p