Tarun Bharat

जोकोव्हिच, फेडरर, नदाल एटीपी पुरस्कार विजेते

वृत्तसंस्था/ लंडन

2020 च्या टेनिस हंगामात सर्बियाचा टॉप सीडेड जोकोव्हिच, स्वीसचा अनुभवी रॉजर फेडरर आणि स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नदाल तसेच फ्रान्सिस टायफो  एटीपी पुरस्कार विजेते ठरले आहेत.

एटीपीतर्फे 2020 च्या टेनिस हंगामासाठी विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. सर्बियाच्या जोकोव्हिचने 2020 च्या टेनिस हंगामाचे एटीपी मानांकनातील आपले अग्रस्थान सहाव्यांदा राखले असून त्याने या कालावधीत ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसह अन्य चार स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा विक्रमी आठवेळा जिंकली आहे.

अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील पुरूष दुहेरीतील विजेती जोडी पेव्हिक आणि सोरेस यांनी वर्षअखेरीस दुहेरीच्या मानांकनात अग्रस्थान मिळविले आहे. दुखापतीमुळे फेडररने 2020 च्या टेनिस हंगामात केवळ एकेरीचे सहा सामने खेळले आहेत. तो आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत विक्रमी 18 व्या वर्षी टेनिस शौकिनांचा एकेरीतील सर्वोत्तम आवडता टेनिसपटू ठरला आहे. स्पेनच्या नदालने सलग तिसऱया वर्षी स्टिफन एडबर्ग स्पोर्ट्समनशीप पुरस्कार मिळविला आहे. नदालने आतापर्यंत 13 वेळा प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. रशियाचा रूबलेव्ह हा नवोदित टेनिसपटूमधील सर्वोत्तम होतकरू म्हणून ओळखला जातो. त्याने 2020 च्या टेनिस हंगामात पाच स्पर्धा जिंकल्या. एटीपीच्या मानांकनात त्याने 23 व्या स्थानावरून आठव्या स्थानावर झेप घेतली आहे.  अमेरिकेच्या टायफोला आर्थर ऍश पुरस्कार देवून गौरवविण्यात आले आहे. 2020 च्या टेनिस हंगामात स्पेनचा 17 वर्षीय कार्लोस अल्कारेझ हा सर्वोत्तम नवोदित टेनिसपटू ठरला असून त्याने तीन चॅलेंजर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. 2020 च्या टेनिस हंगामातील कॅनडाचा पोस्पिसील हा पुनरागमनातील सर्वोत्तम टेनिसपटू ठरला आहे.

Related Stories

लखनौ- हैदराबाद यांच्यात आज लढत

Patil_p

विद्यमान विजेत्या विंडीजचे आव्हान संपुष्टात

Amit Kulkarni

एनबीए स्टार कोबी ब्रायंटचे अपघाती निधन

Patil_p

TokyoOlympics: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा, अंकिता रैना पराभूत

Archana Banage

देवेंद्र झाझरियाला रौप्यपदक

Patil_p

रूमानियाची हॅलेप अंतिम फेरीत

Patil_p