Tarun Bharat

जोतिबाचा चैत्रोत्सव साध्या पद्धतीने

शिवबसवनगरमधील ज्योतिर्लिंग मंदिरात दवणा यात्रेनिमित्त विशेष पूजेचे आयोजन

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्व सण-उत्सवांवर निर्बंध आले आहेत. अनेक मंदिरेदेखील बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाचा जोतिबाचा चैत्रोत्सव शहरात अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. येथील शिवबसवनगरमधील ज्योतिर्लिंग मंदिरात दवणा यात्रेनिमित्त खास पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

सोमवारी पहाटे साडेपाच वाजता महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजेशाही दरबारातील स्वरूपात जोतिबाची विशेष पूजा बांधण्यात आली होती. यावेळी गुलाल-खोबरे-दवण्याची उधळण करून पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. रात्री 8 वाजता महाआरती करून चैत्रपौर्णिमेची सांगता करण्यात आली.

तसेच गेल्या 150 वर्षांपासून परंपरा असलेली चव्हाट गल्लीतील देवदादा इराप्पादादा यांच्या मानाची सासनकाठी यावर्षीही कोरोनाच्या निर्बंधामुळे वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगरावर जाऊ शकली नाही. त्यामुळे पूर्वापार चालत आलेली परंपरा खंडित न करता जोतिबाचा चैत्रोत्सव चव्हाट गल्लीतील देवघरात साधेपणाने पार पडला. सोमवारी सकाळी 8 वाजता जोतिबा देवाला अभिषेक घालून देवघरातून मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्यानंतर दवणा अर्पण करून आंबिल-घुगऱयांचा नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून जोतिबाचा चैत्रोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे मोजक्मयाच भक्तांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला. याबरोबरच प्रसादाचे वाटपही करण्यात आले. तसेच सायंकाळी 6 वाजता ढोल-ताशांच्या गजरात सासनकाठय़ांवर गुलाल-खोबऱयाची  उधळण करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सासनकाठय़ा देवघरात मार्गस्थ झाल्या. यावेळी सर्व धार्मिक विधी करण्यात आले.

Related Stories

केएलई फिजिओथेरपीचा पदवीदान समारंभ

Amit Kulkarni

विविध पोलीस स्थानकांमध्ये गणराया विराजमान

Amit Kulkarni

विविध ठिकाणी शिवजयंती साजरी

Amit Kulkarni

शहरात सर्वत्र शुकशुकाट-शांतता

Amit Kulkarni

इंडियन बॉईज, आर्मी इलेव्हन, यमकनमर्डी, श्री स्पोर्ट्स खडकगल्ली विजयी

Amit Kulkarni

साई स्पोर्ट्स, झेवर गॅलरी डायमंड संघ विजयी

Amit Kulkarni