Advertisements
ऑनलाईन टीम / जोधपूर :
राजस्थानच्या जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील 11 पाकिस्तानी शरणागतींचे मृतदेह आढळून आले आहेत. विषारी वायूगळतीमुळे हे मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. देचू पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. मृत सर्वजण पाकिस्तानातून विस्थापित होऊन भारतात दाखल झाले होते. अचलावता नावाच्या गावात शेतीचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. मृतांच्या कुटुंबात 12 जण राहत होते. त्यामधील एक जण रात्री शेतात झोपायला गेला होता, तो बचावला आहे.
शेतात झोपण्यासाठी गेलेला सदस्य सकाळी घरी आल्यावर त्याला घरातील सगळे निपचित पडल्याचे आढळले. त्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली.