Tarun Bharat

जो बायडेन यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण म्हणाले, अफगाणी नेत्यांनी संघर्ष न करता हार मानली त्यामुळे…


काबुल \ ऑनलाईन टीम

तालिबानने अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानच्या परिस्थितीकडे लागलं आहे. या सगळ्या परस्थितीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला परत बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचं मत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाइट हाऊसमधील इस्ट रुममधून अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी यांचं सरकार पडून तालिबानच्या हातात संपूर्ण देश गेल्यानंतर बायडेन यांचं हे पहिलं भाषण होतं. बायडेन यांनी सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी अफगाणी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. अफगाणी नेत्यांनी संघर्ष न करता हार मानली आणि देश सोडून पळून गेल्याचं मत बायडेन यांनी व्यक्त केलं आहे.

मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. २० वर्षानंतर मला एक गोष्ट समजली की अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कर परत बोलवण्यासाठी योग्य अशी कोणतीच वेळ नव्हती. यामागील धोक्याची आम्हाला जाणीव होती. मात्र खरं सांगायचं झाल्यास सर्व घटना या आम्हाला अपेक्षित होतं त्यापेक्षाही अल्पावधीत घडल्या.

Related Stories

पॅरिसमध्ये रेस्टॉरंट्स बंद

Patil_p

राफेलची पहिली तुकडी 27 जुलैला भारतात दाखल होणार

datta jadhav

अर्थव्यवस्था सुदृढतेच्या दिशेने अग्रेसर

Patil_p

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 35 लाखाचा टप्पा

datta jadhav

महाराष्ट्रातील कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनाही कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

जागतिक ‘पर्यावरण दिन’ २०२२

Rohit Salunke