Tarun Bharat

ज्ञान प्रबोधन मंदिरमध्ये शिक्षक दिन साजरा

प्रतिनिधी /बेळगाव

ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएससी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी शाळेचे संचालक जगदीश कुंटे, अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर, गिरीधर रविशंकर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना जगदीश कुंटे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे विशद केले. शिक्षकांना सर्वप्रकारचे ज्ञान घेऊन चांगला शिक्षक बनण्याविषयी सांगितले. संचालकांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

शिक्षिका सिद्धाली पाटील, वर्षा मडिवाळ, प्रिता कुदळे, मारुती अंबाजी, मोनिका मेंडिस यांचा दहा वर्षे शिक्षण सेवा दिल्याबद्दल तसेच शिक्षकेतर कर्मचारी असलेल्या लक्ष्मी पाटील, मानल टोपले यांचा अनुक्रमे 10 व 20 वर्षे शाळेची सेवा केल्याबद्दल खास गौरव करण्यात आला. शिक्षिका चंद्रज्योती देसाई यांनी प्रार्थना सादर केली. शिक्षिका लुविना धरमदास यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या मंजिरी रानडे यांनी संचालकांचे तसेच सर्व शिक्षकांचे कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले. शाळेच्या पालक प्रतिनिधींतर्फे सुजय पाटील यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

Related Stories

कंठातून निघाला कृष्ण….

Tousif Mujawar

बेळगावमध्ये विमानप्रवास करणाऱयांच्या संख्येत वाढ

Patil_p

शुक्रवारी कोरोनामुळे वृद्धासह दोघे जण दगावले

Amit Kulkarni

चार राज्यांतील भाजपच्या विजयाचा कारवारमध्ये जल्लोष

Omkar B

बसस्थानकाच्या कामाला कधी गती येणार?

Amit Kulkarni

चोरीप्रकरणी त्रिकुटाला अटक

Amit Kulkarni