Tarun Bharat

ज्युडोका सुशीला देवी ऑलिम्पिकसाठी पात्र

Advertisements

बुडापेस्ट / वृत्तसंस्था

भारतीय ज्युडोका सुशीला देवी हिने टोकियो ऑलिम्पिकसाठी कॉन्टिनेन्टल कोटा मिळवला. मात्र, ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी होणार का, हे दि. 28 जून रोजी जाहीर केल्या जाणाऱया क्वॉलिफायर्सच्या यादीनंतर स्पष्ट होणार आहे. ज्युडोकाच्या मानांकनावर कॉन्टिनेंटल कोटा निश्चित होतो. सध्या या मानांकनात सुशीला देवी 989 गुणांसह सातव्या स्थानी विराजमान आहे. या इव्हेंटसाठी आशियाला 10 कोटा प्राप्त आहेत.

‘ऑलिम्पिक आज असती तर त्यासाठी कोण पात्र ठरले असते, हे मानांकनावरुन निश्चित होते. अंतिम यादी 28 जून रोजी जाहीर होईल, त्यावेळी काही बदल त्यात असू शकतात’, असे आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशन वेबसाईटने म्हटले आहे. सुशीला देवीने 48 किलोग्रॅम वजनगटातून पात्रता संपादन केली आहे. क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनीही सुशीला देवीचे यासाठी अभिनंदन केले.

सध्या सुरु असलेली वर्ल्ड चॅम्पियनशिप 13 जून रोजी संपते आणि त्यानंतर एकही पात्रता स्पर्धा होणार नाही. त्यामुळे, बरेचसे चित्र या पात्रता स्पर्धेच्या अखेरीस स्पष्ट होणार आहे. सुशीला देवी लिकमाबम (महिला गट 48 किलोखालील) व जसलीन (पुरुष गट 66 किलोखालील) हे देखील अद्याप पात्रता संपादन करु शकतील, असे भारतीय ज्युडो फेडरेशनने याप्रसंगी म्हटले आहे.

Related Stories

गोव्यात फुटबॉल संघांच्या आगमनाला प्रारंभ

Omkar B

गोलंदाजी, अष्टपैलूंत अश्विन दुसऱया स्थानी कायम

Patil_p

‘त्या’ चुकीमुळे ऋषभ पंतचे ट्रोलिंग

Omkar B

रोहन बोपण्णा- रामकुमार रामनाथन दुहेरीत विजेते

Patil_p

शेवटचा सामना जिंकून लंकेने व्हाईटवॉश टाळला

Patil_p

अध्यक्षपदासाठी दिलीप तिर्कीचा अर्ज दाखल

Patil_p
error: Content is protected !!