Tarun Bharat

ज्युलियन असांजचे होणार अमेरिकेकडे प्रत्यार्पण

Advertisements

लंडन / वृत्तसंस्था

विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. ब्रिटनच्या न्यायालयाने औपचारिकपणे बुधवारी यासंबंधीचा आदेश जारी केला. असांजला न्यायालयाने इराक आणि अफगाणिस्तान युद्धांशी संबंधित गुप्त फाईल्स प्रकाशित केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. असांजचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले असून त्याला 175 वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल. न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी बचाव पक्षाला 18 मेपर्यंत मुदत आहे. न्यायालयाचा हा आदेश ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांच्याकडे जाईल. प्रिती पटेल यांनी असांजच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिल्यास असांजचे वकील या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ब्रिटनच्या उच्च न्यायालयात दाद मागू शकतात.

अफगाणिस्तान-इराक युद्धादरम्यान लष्करी कारवायांशी संबंधित 50,000 गुप्त फाईल्स कथितपणे उघड केल्याबद्दल ज्युलियन असांजवर अमेरिकेला खटला चालवायचा आहे. असांजचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यासाठी अमेरिका गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. अमेरिकन सरकारने असांजला एकाकीपणाची शिक्षा दिली जाणार नाही आणि त्याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर असांजला अमेरिकेत प्रत्यार्पण केले गेले आणि त्याला उच्च सुरक्षा क्षेत्रात ठेवले गेले तर तो आत्महत्या करू शकतो, असा युक्तिवाद असांजच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने असांजला अमेरिकेत प्रत्यार्पणाविरुद्ध अपील दाखल करण्याची परवानगी दिली नाही. असांजला अमेरिकेत जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असा दावा असांजचे वकील बर्नबर्ग पियर्स यांनी सुनावणीवेळी केला होता.

Related Stories

मॉडर्नाची लस, आशेचा नवा किरण

Patil_p

युक्रेनचा ऐतिहासिक वारसा वाचविण्याचे प्रयत्न

Patil_p

मेढा, सातारा पालिकेला अडीच कोटींचा निधी

datta jadhav

चीनमध्ये आढळला नवा संसर्गजन्य आजार

datta jadhav

जिनपिंग यांचा दौरा, भारताकडून प्रत्युत्तर

Patil_p

पाकिस्तानलाही घालायचीय ‘टिकटॉक’वर बंदी

datta jadhav
error: Content is protected !!