Tarun Bharat

‘ज्येष्ठां’साठीची 50 टक्के सवलत रेल्वेकडून बंद

Advertisements

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

भारतीय रेल्वेने दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त लोक, विद्यार्थ्यांसह चार शेणी वगळता अन्य सर्व शेणींसाठी प्रवासभाडय़ात दिली जाणारी सवलत बंद केली आहे. यात 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी 50 टक्क्यांची सवलत देखील सामील आहे. तिकीटदरात सवलत देण्यात आल्याने रेल्वेला मोठा खर्च उचलावा लागतो, याचमुळे ज्येष्ठ नागरिकांसह सर्व शेणींच्या प्रवाशांसठी सवलत वाढविणे सध्या योग्य नसल्याचे उद्गार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काढले आहेत.

रेल्वेचे कमी होत चाललेले उत्पन्न विचारात घेत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वेने मार्च 2020 मध्ये कोरोना संकटामुळे काही दिवस रेल्वेगाडय़ा बंद केल्यावर पुन्हा सेवा सुरू करण्यात आल्यावर प्रवासभाडय़ातील सर्व प्रकारच्या सवलती बंद केल्या होत्या. तर ज्येष्ठांसाठीची 50 टक्क्यांची सवलत कायमस्वरुपी बंद करण्यात आली नसल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

महामारीदरम्यान रेल्वेने प्रवासीसेवा विविध टप्प्यांनुसार पुन्हा सुरू केली होती. परंतु रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना देण्यात येणाऱया सुमारे 53 सेवांपैकी 15 वगळता उर्वरित सर्व अनुक्रमे बंद केल्या. सध्या चालू सवलती सेवांमध्ये 4 दिव्यांगांसाठी, 11 विद्यार्थ्यांसाठी आणि रुग्णासाठी दिल्या जाणाऱया सुविधा सामील आहेत. उर्वरित 38 प्रकारच्या सेवांमध्ये मिळणाऱया सवलती आता पूर्णपणे बंद आहेत.

Related Stories

शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दीष्टाकडे वेगाने वाटचाल

Patil_p

संसदेवरील उद्याचा ट्रक्टर मोर्चा स्थगित

Patil_p

प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस TMC मध्ये दाखल

datta jadhav

ओडिशाची आदिवासी महिलेची कमाल

Patil_p

अभिनेता अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार

Omkar B

काश्मीरमधील गुलमर्गमध्ये पर्यटकांची गर्दी

Patil_p
error: Content is protected !!