Tarun Bharat

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : 


हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.


विनोदवीर म्हणून ख्याती असलेल्या जगदीप याने कारकीर्दीमध्ये 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. त्यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला होता. सय्यद इश्तियाक अहमद जाफरी असे त्यांचे मूळ नाव असून ‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपाली ही त्यांची व्यक्तिरेखा खूप गाजली होती. 


गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात अभिनेता असलेला मुलगा जावेद जाफरी, निर्माता व दिग्दर्शक असलेला दुसरा मुलगा नावेद, मुलगी मुस्कान व दुसरी पत्नी नाझिमा असा परिवार आहे. 


जगदीप यांनी अंदाज अपना अपना, फिर वही रात, शहेनशहा, कुर्बानी यासारख्या सिनेमात काम केले आहे. ‘शोले’ मधील ‘सूरमा भोपाळी’ हे नाव इतके प्रसिद्ध झाले की त्यांनी या नावाने एका सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले. विशेष म्हणजे त्यांची निर्मिती असलेल्या एक मात्र चित्रपटाचे नाव देखील ‘सूरमा भोपाळी’ आहे. 

Related Stories

विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं

datta jadhav

प्रथमच मराठीतून रामायण पाहायला मिळणार

Patil_p

विवाह तुमचा, खर्च आमचा

Amit Kulkarni

महाराष्ट्राला खळखळून हसवणारं व्यक्तिमत्त्व ; पु .ल देशपांडे जयंती विशेष ब्लॉग

Anuja Kudatarkar

अवरोध 2’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

’प्लॅनेट मराठी’ आणि ’रावण’ येणार एकत्र

Patil_p