Tarun Bharat

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी साकारणार जिजामातांची भूमिका!

ऑनलाईन टीम / मुंबई :

सोनी मराठी वाहिनीवरील सोम ते शनि. रात्री 8.30 वाजता प्रसारित होणाऱ्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. 

स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे. 

ही मालिका लवकरच लीप घेणार असून जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी दिसणार आहेत. नीना कुलकर्णींसारखी दिग्गज अभिनेत्री जिजाऊंची भूमिका साकारायला सज्ज झाली आहे. 

स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास जिजाऊंच्या नजरेतून मांडण्यात आला आहे. 

Related Stories

आता भरा 20 लाखांचा दंड

Patil_p

जॅकलीन झाली ‘हंटर रानी’

Amit Kulkarni

राजेश्वरीचा ट्रोलरला ‘शालू’तून फटका

Patil_p

कतरिनाच्या चित्रपटाची संजय लीला भन्साळी करणार निर्मिती

tarunbharat

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Archana Banage

खुशी चालूवर्षीच ठेवणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Patil_p